Ind vs Aus 2nd ODI Playing XI sakal
क्रीडा

Ind vs Aus 2nd ODI Playing XI: कर्णधार राहुल संघात करणार 2 मोठे बदल? भारत अन् ऑस्ट्रेलियाचे हे असू शकते संभाव्य प्लेइंग-11

Kiran Mahanavar

India vs Australia 2nd ODI 2023 Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना 24 सप्टेंबरला होळकर स्टेडियम इंदूर येथे होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने 5 विकेटने जिंकला होता. अशा स्थितीत भारतीय संघ दुसरी वनडे जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावले, तर यष्टीरक्षक जोश इंग्लिसने 45 चेंडूत 45 धावांची दमदार खेळी केली. भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी 71 आणि 74 धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. नंतर केएल राहुलने (नाबाद 58) सूर्यकुमार यादव (50 धावा) सोबत 80 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, पण त्याला केवळ 3 धावा करता आल्या, तर पाचव्या क्रमांकावर असलेला इशान किशनही 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या दोघांवर दुसऱ्या वनडेत चांगली कामगिरी करण्याचे दडपण नक्कीच असेल.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, मोहम्मद शमीने 51 धावांत 5 विकेट घेतल्या. मात्र, शार्दुल ठाकूर चांगलाच महागात पडला. त्याने 10 षटकात 78 धावा दिल्या, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे केएल राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक किंवा दोन बदल करण्याची शक्यता आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशॅग्ने, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Election : विधानसभेसाठी ठाकरेंचा प्लॅन A आणि प्लॅन B तयार? राऊत- शाह भेटीबद्दल वडेट्टीवारांनी काय दिले स्पष्टीकरण

IPL 2025: तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ?

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना टक्कर देणार भरतिया समूह; कोका-कोलामधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार

Latest Maharashtra News Updates : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह 7 जणांचा मृत्यू

Diwali 2024 Crackers: दिवाळीत फटाके फोडतांना बाळगा सावधगिरी, तज्ज्ञांचा सल्ला, अन्यथा...

SCROLL FOR NEXT