ind vs aus 2nd-odi-visakhapatnam weather-report-rain 
क्रीडा

IND vs AUS 2nd ODI : दुसरा एकदिवसीय सामना होणार रद्द? विशाखापट्टणम मधून आली मोठी अपडेट

Kiran Mahanavar

India vs Australia 2nd ODI : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धमाकेदार सुरुवात केली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना 5 गडी राखून जिंकला आहे. मुंबई वनडे जिंकून टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. आता दुसरा सामना रविवारी 19 मार्चला विशाखापट्टणम येथे होणार आहे.

मात्र या दुसऱ्या वनडेमध्ये पावसाचा धोका निर्माण झाला आहे. वास्तविक भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक बदल झाला आहे. पण दिल्ली, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला.

विशाखापट्टणमची स्थितीही अशीच आहे. रविवारी येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Accuweather नुसार रविवारी विशाखापट्टणममध्ये पावसाची 80 टक्के शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील.

रविवारी सकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. अशा स्थितीत ओल्या मैदानामुळे नाणेफेक होण्यास विलंब होऊ शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी 4 ते 6 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच वाजेच्या सुमारास जवळपास 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी मानली जाते. 2019 मध्ये येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 387 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्माने 159 आणि केएल राहुलने 102 धावा केल्या. 2018 मध्ये 321 धावा केल्यानंतरही येथे भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना बरोबरीत सुटला होता.

टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये संघाला 7 विजय आणि फक्त एक पराभव मिळाला आहे. एक सामना बरोबरीत तर एक अनिर्णित राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT