India Vs Australia 2nd T20 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिल्या सामन्यात मिळवलेली लय कायम ठेवली. दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 20 षटकात 4 विकेट गमावत 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 191 धावा करू शकला आणि सामना गमावला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. गेल्या सामन्यात लवकर आऊट झालेल्या यशस्वी जैस्वालने या सामना 212 च्या स्ट्राइक रेटने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात षटकार चौकारचा पाऊस पडला. आणि ताबडतोड अर्धशतक (53) ठोकले, ज्यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड सोबत यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 35 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली, जी सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जैस्वालच्या विकेटने संपली. जैस्वालच्या विकेटनंतर असे वाटले की षटकार चौकार थांबतील, पण इशान किशन आणि गायकवाड यांनी ती लय कायम ठेवली.
यानंतर 16व्या षटकात भारताची दुसरी विकेट ईशान किशनच्या रूपात पडली, जो 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. विकेट गमावण्यापूर्वी इशान किशनने ऋतुराज गायकवाडसह दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची (58 चेंडू) मजबूत भागीदारी केली. त्यानंतर 18व्या षटकात नॅथन एलिसचा बळी ठरलेल्या सूर्यकुमार यादवच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. सूर्याने 10 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 19 धावांची खेळी केली.
त्यानंतर 20व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नॅथन एलिसने उपकर्णधार गायकवाडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गायकवाडने 43 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग आणि तिलक वर्मा नाबाद परतले. रिंकू सिंगने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली आणि तिलक वर्मा 2 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 7 धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियनकडून ग्लेन मॅक्सवेलने 2 षटकात 38 धावा दिल्या. याशिवाय शॉन अॅबॉटने 3 षटकात 56 धावा दिल्या. अॅडम झाम्पाने 4 षटकांत 33 धावा आणि तनवीर संघाने 4 षटकांत 34 धावा दिल्या. दरम्यान, नॅथन एलिसने 3 बळी घेत संघासाठी यशस्वी गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. यादरम्यान त्याने 4 षटकात 45 धावा दिल्या. तर मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या 30 धावांपर्यंत पोहोचली. मात्र, शॉर्ट 19 धावा करून बाद झाला आणि कांगारू संघ रुळावरून घसरला.
त्यानंतर इंग्लिश 2, मॅक्सवेल 12 तर स्मिथही 19 धावा करून बाद झाला. स्टॉइनिस आणि डेव्हिडने अर्धशतकी भागीदारी करून संघात पुनरागमन केले, पण डेव्हिड बाद झाल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला.
डेव्हिडने 37 आणि स्टॉइनिसने 45 धावा केल्या. शेवटी मॅथ्यू वेडने नाबाद 42 धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियन संघ नऊ गडी गमावून 191 धावाच करू शकला.
भारताकडूनप्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
मार्कस टॉइनीस आणि टिम डेव्हिड यांच्यात पार्टनरशीप सुरू असून ऑस्ट्रेलीयाच्या चार विकेट्सच्या बदल्यात १३२ धावा झाल्या आहेत. टॉइनीस 18 चेंडूत ४० धावांवर तर डेव्हिड १७ चेंडूत ३१ धावा करून नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियायला अजून विजयासाठी मोठा टप्पा पार करायचा आहे
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 235 धावा केल्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वालने 53, ऋतुराज गायकवाडने 58 आणि इशान किशनने 52 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत ३१ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल, परंतु रात्री फलंदाजी करणे सोपे आहे कारण दव आल्यावर भारताला गोलंदाजीमध्ये अडचणी येऊ शकतात.
इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही चांगल्या गतीने धावा करत आहेत आणि भारताला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या १६४/1 आहे.
यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात किती अप्रतिम सुरुवात केली. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण पुढच्या चेंडूवर तो आऊट झाला. जैस्वालने 25 चेंडूत 53 केल्या. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. नॅथन एलिसने त्याला अॅडम झाम्पाकडून झेलबाद केले.
यशस्वीने चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण केल्या. या षटकात एकूण 24 धावा आल्या. यशस्वीने सलग पाच चेंडूंवर चौकार ठोकले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांगारूंने संघात दोन बदल केले आहेत.
त्याचवेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, मलाही प्रथम गोलंदाजी करायची होती. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.