ind vs aus-3rd-odi-match-chennai-weather-forecast-report-chennai-rain-india-vs-australia cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS ODI: चेन्नईहून चाहत्यांसाठी वाईट बातमी! भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे होणार रद्द?

Kiran Mahanavar

IND vs AUS Chennai Weather Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना उद्या म्हणजेच 22 मार्चला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.

तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतासाठी हा सामना 'करा किंवा मरो'चा असणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे.

तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो. असे झाल्यास तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची भारताची संधी दूर होईल.

सोमवारी चेन्नईमध्ये जोरदार पाऊस झाला. मंगळवारीही चेन्नईत पावसाची शक्यता आहे. चेन्नई येथे उद्या म्हणजेच २२ मार्चला होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यावर पावसाचे सावट आहे.

तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर उद्या दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या दिवशी दुपारी 12 वाजता पावसाची 16 टक्के शक्यता आहे.

सामना या दरम्यान आर्द्रता 74 टक्के राहील तर ताशी 13 किमी वेगाने वारे वाहतील. जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसा पावसाची शक्यता कमी आहे, पण मध्यभागी पडणारा पाऊस हा सामना नक्कीच थांबवू शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्यास तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील आणि भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची संधी संपुष्टात येईल.

मुंबईतील पहिली वनडे भारताने 5 गडी राखून जिंकली होती. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT