Ind vs Aus 3rd T20 Mukesh Kumar sakal
क्रीडा

Ind vs Aus 3rd t20 : तो लग्नासाठी घरी गेला, त्याच्याजागी नवा आला! 'या' स्टार खेळाडूची भारतीय संघात एट्री

Kiran Mahanavar

Ind vs Aus 3rd T20 Mukesh Kumar : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज म्हणजेच 28 नोव्हेंबरला खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आपल्या घरी परतला आहे.

कारण मुकेशचे लग्न आहे. मुकेशच्या जागी एका स्टार गोलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी मुकेश कुमार लग्नासाठी घरी परतल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले की, वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी त्याला भारतीय संघातून मुक्त करण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. मुकेशचे लग्न होत असून त्याला सुट्टी देण्यात आली आहे. त्याच्या जागी भारतीय स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

मात्र, दीपक तिसऱ्या टी-20 सामन्यात उपलब्ध होणार नाही. रायपूरमध्ये होणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी तो संघात सामील होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या दोन सामन्यांसाठी दीपकचा संघात समावेश करण्यात आला आहे. चौथ्या टी-20 मध्ये दीपकचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेदरम्यान भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मुकेश कुमार विवाहबंधनात अडकणार आहे. मुकेशचे लग्न आज म्हणजेच २८ नोव्हेंबरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT