india vs australia 
क्रीडा

IND vs AUS: हैदराबादमध्ये इतिहास रचण्याची संधी, भारत मालिका जिंकण्याच्या तयारीत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या लढतीत हर्षल; युझवेंद्रच्या फॉर्मवर नजरा

Kiran Mahanavar

India vs Australia 3rd t20 Match : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आज येथे होणाऱ्या अखेरच्या टी-20 लढतीत मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणार हे निश्चित आहे. मोहालीत पराभूत झाल्यानंतर नागपूरमधील दुसऱ्या टी-20 लढतीत 6 गडी राखून विजय साकारल्यानंतर आता टीम इंडिया विश्वकरंडकाआधी मालिका विजयाला गवसणी घालून आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. अर्थात भारतीय संघाला यानंतर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करावयाचे आहेत; पण त्याआधी हर्षल पटेल व युझवेंद्र चहलचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय असणार आहे.

कर्णधार रोहित, के. एल. राहुल व विराट कोहली या पहिल्या तीन क्रमांकाच्या फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. गेल्या काही सामन्यांमध्ये या तीन फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसून येत आहे. सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण त्याचा फलंदाजी फॉर्मही चढ-उतारामधून जात आहे. आयपीएलपासून हार्दिक पंड्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. फलंदाजी तसेच गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याने. आपला ठसा उमटवला आहे. दिनेश कार्तिकने नागपूर लढतीत फिनीशर म्हणून आपली ओळख जपली.

गोलंदाजांनी सुधारणा करावी जसप्रीत बुमराहचे दुसऱ्या लढतीत पुनरागमन झाले. त्याने अॅरॉन फिंचचा त्रिफळा उडवला आणि भारतासाठी निर्णायक कामगिरी बजावली. अक्षर पटेल यानेही दोन षटकांमध्ये प्रभावी कामगिरी केली, पण हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांच्या कामगिरीत सुधारणा आवश्यक आहे.

मॅक्सवेलकडून अपेक्षा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला पहिल्या दोन लढतींत फक्त एकच धाव करता आली आहे. कांगारुंना उद्याच्या लढतीत त्याच्याकडून अपेक्षा आहेत. तसेच पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, डॅनियल सॅम्स, सीन अॅबॉट या वेगवान गोलंदाजांनीही अपेक्षित कामगिरी केली नाही. ॲडम झाम्पा या फिरकी गोलंदाजाने आपली चुणूक दाखवली. त्याच्याकडून पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे. टीम डेव्हिडवरही सगळ्यांच्या नजरा असतील.

  • आजची तिसरी लढत हैदराबाद, सायंकाळी ७ वाजल्यापासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT