India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना नागपुरात खेळला गेला होता ज्यात टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये खेळपट्टीबाबत बराच गदारोळ केला होता.
नागूपरमधील पहिला सामना संपल्यानंतर आता दिल्लीतील दुसऱ्या सामन्याचे विघ लागले आहेत; परंतु धरमशाला येथे नियोजित असलेला तिसरा कसोटी सामना दुसरीकडे खेळवला जाण्याची शक्यता अधिक आहे.
धरमशाला येथे 1-5 मार्च दरम्यान तिसरा कसोटी सामना होणे अपेक्षित आहे, परंतु मैदानावरचे नूतनीकरण पूर्ण झालेले नाही, परिणामी सामना होण्याची शक्यता कमी आहे, बीसीसीआयकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
एकीकडे तपासणी सुरू असली तरी बीसीसीआयने पर्यायी व्यवस्थेचा केवळ विचारच केलेला नाही तर पुणे, विशाखापट्टणम, राजकोट आणि इंदूर यांना सज्जतेच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. निर्सगाच्या कुशीत असलेल्या धर्मशाला येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन लागोपाठ द्वेन्टी-२० सामने झाले होते. त्यानंतर येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. त्यामुळे मैदानातील पाणीवाहक व्यवस्था अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले. परिणामी यंदाच्या मोसमातील हिमाचल प्रदेशचे घरच्या मैदानावरचे सामने इतरत्र हलवण्यात आले होते.
मैदानावरील सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था (जमिनीखाली पाईप लाईन) करण्यासाठी मैदान खणण्यात आले होते. त्यातील काही जागांवर अजून हिरवे गवत तयार झालेले नाही, अशी सध्याची स्थिती आहे. बीसीसीआयकडून ३ तारखेपासून सातत्याने तपासणी सुरू आहे. काही दिवसांत पून्हा तपासणी होईल आणि त्यानंतर लगेचच निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
धर्मशाला येथे या अगोदर 2017 मध्ये बॉर्डर-गावसकर मालिकेतील निर्णायक सामना झाला होता. विराट कोहली खांदा दुखापतीमुळे खेळला नव्हता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने तो सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.