India vs Australia Indore Test 
क्रीडा

IND vs AUS : पराभवाची टांगती तलवार! आता चमत्कारावरच टीम इंडियाचा भरवसा

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia Indore Test : क्रिकेटध्ये काहीही अशक्य नाही, केवळ भरवसा हवा असे म्हटले जाते... भारतीय क्रिकेट संघ आता भरवसा आणि चमत्कारावरच अवलंबून आहे. तिसरा कसोटी सामना हातातून जवळपास गेलाच आहे. केवळ दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडले तेच उद्या सकाळी घडते का, यावर भारतीयांच्या सर्व आशा अवलंबून आहेत.

पहिल्या डावात ८८ धावांची पिछाडी त्यानंतर भारताचा दुसरा डाव १६३ धावांत गारद त्यामुळे उद्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७६ - धावांची गरज आहे. खेळपट्टी कशीही असली, तरी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. तरीही दोन दिवसांच्या खेळात दोन्ही संघांचे मिळून तब्बल ३० फलंदाज बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून उद्या एकदोन फलंदाजांकडून आक्रमक फलंदाजी करून दडपण उडवण्याचा प्रयत्न केला जाईल.

असा चमत्कार अपेक्षित

आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज ५.४ षटकांत केवळ ११ धावांत बाद केले होते. यात उमेश यादवने ३-१-७-२ आणि अश्विनने ४.२-२-४-३ अशी कामगिरी केली. असाच चमत्कार उद्या झाला तरच भारताला सनसनाटी विजय मिळवता येईल.

दोन दिवसांच्या खेळात ३० फलंदाज बाद होत असताना भारतीय संघ आज सकाळी तासाभराच्या खेळाचा अपवाद वगळता बॅकफूटवरच राहिला आहे. सकाळी परिणामकारक गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर रोखण्यात यश मिळवले. तरीही ८८ धावांच्या पिछाडीने भारतीयांवरचे दडपण कायम राहिले.

भारताचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला होता. आज दुसरा डाव १६३ धावांत संपला. चुकांपासून बोध काही घेता आला नाही. अपवाद मात्र चेतेश्वर पुजाराचा, त्याने झुंझार ५९ धावांची खेळी करून प्रतिकूल परिस्थितीत कशी फलंदाजी करायची याचा आदर्श ठेवला, पण इतरांना बोध घेता आला नाही. नॅथन लायनने ६४ धावांत ८ विकेट टिपले.

आज सकाळी खेळ सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे उर्वरित सहा फलंदाज बाद करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले असले तरी, सुरुवातीला हँडस्कोंब आणि कॅमेरून ग्रीन यांनी चांगला किल्ला लढवला होता. त्यांच्या बचावात विश्वास होता आणि एकेरी धावा घेण्याच्या तंत्रात लकब. तब्बल एक तास दोघांनी विकेट जाऊ दिली नाही, परंतु जलपानाच्या विश्रांतीनंतर चक्र फिरले.

कर्णधार रोहित शर्माच्या योजना थोड्या विचित्र वाटल्या, कारण त्याने अश्विनला एक तास गोलंदाजीची संधी दिली नाही. दोन उजवे फलंदाज खेळत असल्याने रोहितने जडेजा- अक्षर जोडीला गोलंदाजी दिली. एका तासानंतर एका बाजूने अश्विन आणि दुसऱ्या बाजूने उमेश यादव असा दुहेरी बदल रोहितने केला. हाच बदल मोठा परिणाम करून गेला आणि ४ बाद १८६ धावसंख्येवर अश्विनने हँड्सकोंबला बाद केले. समोरून उमेश यादवने फारच भन्नाट मारा केला. त्याने प्रथम ग्रीनला पायचित केले आणि लगेच मिचेल स्टार्कची यष्टी लांब उडवली. त्याच भरात अश्विनने अलेक्स कॅरीला; तर उमेशने टॉड मर्फीला बाद केले. नॅथन लायनला त्रिफळाचीत करून अश्विनने तिसरा बळी नोंदवला.

शुभमन गिलची चूक कालच्या पहिल्या दिवशी

सामन्याच्या सुरुवातीलाच पुढे सरसावत उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शमनि विकेट गमावली होती. हे उदाहरण ताजे असतानाही शुभमन गिलने तिच चूक आज केली आणि आपली विकेट गमावली. उपाहारानंतर रोहित शर्मा लायनला पायचित झाला आणि दडपण वाढू लागले. त्यातून १३ धावांवर खेळणाऱ्या विराट कोहलीला कुहनेमनने पायचित करून मोठा धक्का दिला. भारताचा ३ बाद ५४ धावांवर घसरणारा डाव दोन राजकोटच्या खेळाडूंनी थोडा सावरला. जडेजा सात धावांवर बाद झाला, पण त्याने काही

काळ पुजाराला साथ दिली. गेल्या काही डावांत अपयश आलेल्या चेतेश्वर पुजाराने निग्रहाने भक्कम फलंदाजी करून संघाला तारले. पुजाराने खराब खेळपट्टीवर कसे खेळायला हवे हे दाखवून दिले. त्याने गोलंदाजांना विचार करत ठेवले. नेहमीपेक्षा जास्त वेळा त्याने धावा घेण्याचा प्रयत्न करणारे फटके मारले. पुजाराला श्रेयस अय्यरने झटपट २६ धावा करून साथ दिली म्हणून भारताला पिछाडीतून सुटका मिळाली.

सुंदर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला तंबूत परतावे लागले ते ख्वाजाने सूर मारत पकडलेल्या झेलमुळे. एका बाजूने पुजारा दर्जेदार फलंदाजी करत होता, तरी दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने फलंदाज बाद होण्याचा प्रकार चालू होता. भरत लगेच बाद झाला; तर अश्विन प्रतिकार करून. दुसऱ्या डावात ८ भारतीय फलंदाजांना बाद करणाऱ्या लायनला पुजाराने पुढे सरसावत प्रेक्षकांत भिरकावून देणारा षटकार मारल्यावर सगळे भारतीय खेळाडू आनंदाने चकित झाले. त्याच पुजाराला लायनने स्मिथकरवी झेलबाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT