IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला.
त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाने प्रथम भारताच्या सलामीच्या जोडीला बाद केले, तर नॅथन लायनने अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने सुरुवात चांगली झाली नाही. सलामीची जोडी आऊट झाल्यानंतर काही अंतराने सतत विकेट गमावण्यास सुरुवात केली. इंदूर येथे होत असलेल्या या सामन्यात खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच फिरकीपटूंना साथ देत असून फलंदाज चकमा देत असल्याचे दिसून येत आहे.
सलामीची जोडी बाद झाल्यानंतर पुजारा क्रीझवर आला आणि त्याच्यासमोर नॅथन लायनचे आव्हान होते, जे त्याला पार करता आले नाही. 9व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या लायनने पहिला चेंडू सरळ टाकला, तर दुसरा चेंडू बोटे फिरवून हवेत फिरवला. ज्यामुळे पुजाराला बाजूला सरकला आणि चेंडू थेट स्टंपमध्ये गेला. हे पाहून खुद्द नॅथनही चकित झाला, तर समोर उभा असलेला कोहलीही बघतच राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.