Pitch Report Narendra Modi Stadium: भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकदिवसीय विश्वकरंडकाची अंतिम लढत रंगणार आहे. ही लढत ज्या खेळपट्टीवर रंगणार आहे, ती कशी असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अत्यंत महत्त्वाची लढत ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे. ती खेळपट्टी फलंदाजीला पोषक असणार आहे; पण काहीशी संथही असण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर दोन्ही देशांतील खेळाडूंचा कस लागेल, एवढं मात्र निश्चित आहे.
अंतिम सामन्यासाठी एकदम नवी कोरी खेळपट्टी वापरण्यात येणार नाहीये, तर अगोदर एका सामन्यात वापरली गेलेली खेळपट्टी भरपूर विश्रांतीनंतर परत तयार करून वापरण्यात येणार आहे. ज्याला क्रिकेटच्या भाषेत ब्लॅक साईल विकेट म्हटले जाते. तयारी करताना
या खेळपट्टीवर प्रचंड जास्त पाणी मारून वजनदार रोलरने रोलिंग केले गेले नाहीये. पुरेसे पाणी आणि मध्यम आकाराचा रोलर वापरला गेला आहे. म्हणजेच अंतिम सामन्याची खेळपट्टी फलंदाजीला पोषक, पण थोडी संथ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑस्ट्रेलियन संघ सरावासाठी आला तेव्हा त्यांनी ५ तासांच्या अवधीमध्ये तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. पाच तासात खेळपट्टीच्या कोरडेपणात किती फरक पडतो, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांना तेज मारा करताना अगदी थोडा वेळ मदत मिळेल. याचाच अर्थ असा की वेगवान गोलंदाजांना नुसता वेग वापरून चालणार नाही. गोलंदाजीच विविधता आणावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.