IND vs AUS Dinesh Karthik : नागपूर T20 मध्ये टीम इंडियाच्या शानदार विजयानंतर दिनेश कार्तिकची खूप चर्चा होत आहे. अखेरच्या 2 चेंडूत 10 धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा कार्तिकने उचलला आहे. कार्तिकआधी ऋषभ पंतला फलंदाजीसाठी पाठवण्याच्या विचार चालू होता. सामन्यानंतर याचा खुलासा खुद्द कर्णधार रोहित शर्मानेच केला आहे.
नागपुरात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91 धावांचे लक्ष्य दिले होते. जे यजमान भारताने शेवटच्या षटकात चार विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ऋषभ पंतला पाठवता येईल का याचा विचार करत होतो, पण मला वाटले की सॅम्स शेवटचे ओव्हर टाकेल. आणि तो फक्त ऑफ कटर टाकेल, म्हणून मला वाटले की डीकेला येऊ द्या. तरीही तो संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे.
पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना कार्तिकला फलंदाजीची संधी मिळाली जेव्हा पांड्या 7 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद झाला. रोहित शर्माने 7व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला.
यानंतर फिनिशिंग टच देत दिनेश कार्तिकने सॅम्सच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या स्लो बॉलवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर डीप मिड-च्या दिशेने चौकार मारला. कार्तिकने अवघ्या 2 चेंडूत 10 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या टोकाला नाबाद 46 धावांची खेळी करणारा कर्णधार रोहित शर्मा कार्तिकच्या फलंदाजीवर खूप खूश दिसत होता. या मालिकेतील निर्णायक सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.