ind vs aus odi hardik pandya-statement-on-jasprit-bumrah-comeback-bcci-update team india  sakal
क्रीडा

IND vs AUS: 'बुमराहच्या अनुपस्थितीमुळे काही फरक पडत नाही...' पांड्याच्या वक्तव्यानंतर टीम इंडियात खळबळ

Kiran Mahanavar

Ind vs Aus ODI Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. जसप्रीत बुमराहला पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी किमान सहा महिने लागतील. 2023 विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाणार आहे.

अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला 2023 विश्वचषकासाठी पूर्ण फिटनेस मिळणे कठीण आहे. त्याचवेळी बुमराह ऑगस्टपर्यंत नेटमध्ये सहभागी होऊ शकतो. 2023 आशिया चषक सप्टेंबरमध्ये सुरू होत असल्याने, तो कोणत्याही परिस्थितीत स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.

अष्टपैलू हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहबाबत केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. हार्दिक पांड्याच्या म्हणण्यानुसार, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला काही फरक पडत नाही. मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहवर धक्कादायक विधान केले.

पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्या म्हणाला, जसप्रीत बुमराह काही काळ टीम इंडियासोबत नाही, तरीही आमचा गोलंदाजी विभाग चांगली भूमिका बजावत आहे. आमचे सर्व गोलंदाज आता अनुभवी आहेत. जसप्रीत बुमराहच्या पाठीवर नुकतीच न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली. वर्ल्डकपपर्यंत पुनरागमन करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.

पांड्या पुढे म्हणाला, 'जस्सी असल्याने मोठा फरक पडतो, पण खरे सांगायचे तर आम्हाला त्याची फारशी चिंता नाही कारण ज्या खेळाडूंनी जस्सीची भूमिका स्वीकारली आहे, मला खात्री आहे की ते चांगले करत आहेत.

BCCI च्या वैद्यकीय पथकाने नुकतेच स्पष्ट केले आहे की, जसप्रीत बुमराहला 2023 च्या विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त करण्याची योजना आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

आता तो या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तंदुरुस्त होऊ शकतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह मार्च अखेरपर्यंत न्यूझीलंडमध्ये असण्याची अपेक्षा आहे आणि ऑगस्टपासूनच तो गोलंदाजी सुरू करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

SCROLL FOR NEXT