IND vs AUS Live Score 
क्रीडा

IND vs AUS Score : रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी केला पराभव

Kiran Mahanavar

India vs Australia 5th T20 Score News : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (३ डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने विजयी घोडदौड कायम ठेवली. यासह भारतीय संघ या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-1 ने कब्जा केला. एका रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. टीम इंडियाकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करत अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या हातून विजय हिसकावून घेतला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा -

Ind vs Aus : बदला...! वर्ल्ड कप हुकला पण टी-20 मालिकेत टीम इंडियाचा ट्रॉफीवर कब्जा, मालिका 4-1ने खिशात

IND vs AUS Live Score : सामना रोमांचक मोडवर! ऑस्ट्रेलियाला 18 चेंडूत 32 धावांची गरज

मुकेश कुमारने सलग 2 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 18 चेंडूत 32 धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये!

अर्शदीप सिंगने भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्याने 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेन मॅकडरमॉटला बाद केले. मॅकडरमॉटने 36 चेंडूत 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 16 षटकात 5 विकेट गमावत 124 धावा केल्या आहेत.

द बिश्नोई शो...! पाहुण्यांना मोठा धक्का, हेडपाठोपाठ हार्डी आऊट

द बिश्नोई शो...! रवी बिश्नोईने आता पाहुण्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने आरोन हार्डीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात हार्डी बाद झाला. श्रेयस अय्यरने त्याचा चौकारावर झेल घेतला. ऑस्ट्रेलियाने आठ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा केल्या आहेत.

पाहुण्यांना दूसरा मोठा झटका! ट्रेविस हेड 'क्लीन बोल्ड'

रवी बिश्नोई यांनी भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याने पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. हेडने बाद होण्यापूर्वी बिश्नोईच्या चेंडूवर षटकार मारला होता. पुढच्याच चेंडूवर भारतीय गोलंदाजाने बदला घेतला. हेडने 18 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. ऑस्ट्रेलियाने सहा षटकांत दोन गडी गमावून ५० धावा केल्या आहेत. बेन मॅकडरमॉट 15 धावांवर नाबाद आहे तर ऍरॉन हार्डी दोन धावांवर नाबाद आहे.

IND vs AUS Live Score : मुकेश कुमारने केली फिलिपची शिकार अन् पाहुण्यांना दिला मोठा धक्का!

मुकेश कुमारने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले आहे. 22 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे.

IND vs AUS Live Score : शेवटच्या टी-20 सामन्यात टॉप ऑर्डर फेल! श्रेयस अय्यर एकटा नडला! ऑस्ट्रेलियाला दिले 161 धावांचे लक्ष्य

शेवटच्या टी-20 भारतीय सामन्यात टॉप ऑर्डर फेल ठरले पण श्रेयस अय्यर एकटा नडला. त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. टीम इंडियाने कांगारूंना 161 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताने 20 षटकांत आठ विकेट गमावत 160 धावा केल्या.

संघाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याने 37 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. अक्षर पटेलने 21 चेंडूत 31 तर जितेश शर्माने 16 चेंडूत 24 धावा केल्या.

भारतीय टॉप ऑर्डर यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 21 तर ऋतुराज गायकवाड 10 धावा सूर्यकुमार यादव पाच धावा आणि रिंकू सिंग सहा धावा करून आऊट झाले. शेवटच्या चेंडूवर रवी बिश्नोई दोन धावा करून रन आऊट झाला.

ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डोर्सिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाला प्रत्येकी एक यश मिळाले.

 अक्षर पटेलचा खेळ खल्लास! टीम इंडियाला बसला सहावा धक्का

अक्षर पटेलही 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आऊट झाला. यासह भारताची सहावी विकेट गेली. जेसन बेहरेनडॉर्फने त्याला झेलबाद केले. अक्षरने 21 चेंडूत 31 धावा केल्या.

भारताचा निम्मा संघ तंबूत

जितेश शर्माच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. मॅथ्यू शॉर्टच्या हातून त्याला अॅरॉन हार्डीने झेलबाद केले. जितेशने 16 चेंडूत 24 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार मारला. भारताने 14 षटकात 5 विकेट गमावत 99 धावा केल्या आहेत.

 बंगळूरमध्ये भारतीय फलंदाजांनी टाकल्या नांग्या! कर्णधार सूर्यानंतर रिंकू सिंगही आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विकेट्स सातत्याने पडत आहेत. रिंकू सिंगच्या रूपाने टीम इंडियाला चौथा धक्का बसला. आठ चेंडूत सहा धावा करून तो बाद झाला.

भारताने 10 षटकात 4 विकेट गमावत 61 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर 11 आणि जितेश शर्मा पाच धावांवर नाबाद आहे.

बंगळूरमध्ये भारतीय फलंदाजांची हालत खराब! कर्णधार सूर्याने पण सोडली टीम इंडियाची साथ

बंगळूरमध्ये भारतीय फलंदाजांची हालत खराब झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही टीम इंडिया सोडली आहे. 50 धावांच्या आत भारताला तिसरा धक्का बसला आहे. आता सर्वांच्या आशा श्रेयस अय्यरवर आहेत.

टीम इंडियाला बसले दोन मोठे धक्के! यशस्वीनंतर ऋतु'राज'ने सोडली भारताची साथ

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आता तरी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आहे. टीम इंडियाची सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतली आहे. जैस्वालनंतर गायकवाडही झेलबाद झाला आहे. या सामन्यात गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही. तो 12 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.

भारताने पाच षटकांत दोन गडी बाद 34 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत.

टीम इंडियाला मोठा धक्का! 2 षटकार 1 चौकार मारत जैस्वाल तंबूत

यशस्वी जैस्वालच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. यशस्वीने 15 चेंडूत 21 धावा करून झेलबाद झाला. यादरम्यान त्याने 2 षटकार 1 चौकार मारत होता. तो बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर क्रीजवर आला.

IND vs AUS Live Score : ऋतुराज अन् यशस्वी मैदानात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या डावाला सुरूवात...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. ऋतुराज गायकवाडसह यशस्वी जैस्वाल क्रीझवर आली आहे. ऑस्ट्रेलियासाठी अॅरॉन हार्डीने गोलंदाजीची सुरुवात केली आहे.

IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला 'हा' निर्णय! जाणून घ्या Playing-11

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने पाचव्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. त्याने यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, अर्शदीप सिंग या सामन्यात खेळत आहे. दीपक चहर कौटुंबिक कारणांमुळे घरी गेला आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT