Ind vs Aus T20 Series : 2023 च्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. रोहित शर्मा ब्रिगेडने संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. परंतु एका 'खराब दिवशी' त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी झाली. आणि ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव झाला.
पण वर्ल्ड कप 2023 नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ज्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र एकेकाळी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेले नाही. भुवनेश्वरने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५६ विकेट्स घेतल्या आहेत.
2023 च्या वर्ल्ड कपसोबतच भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळली जात होती. या मालिकेत खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन अपेक्षित होते, त्यात भुवनेश्वर कुमारचे नाव होते.
भुवीने 7 सामन्यात 16 विकेट घेतल्या. त्यामुळे वर्ल्ड कपनंतर अनेक गोलंदाजांना विश्रांती दिली जाईल. त्यावेळी भुवनेश्वर संघात पुनरागमन करेल, असे मानले जात होते. त्याच्या पुनरागमनाच्या बातम्या आल्या पण संघाची घोषणा झाल्यानंतर हे सर्व वृत्त खोटे ठरले. हा स्विंग गोलंदाज संघात स्थान मिळवू शकला नाही.
भुवनेश्वर कुमार अशा गोलंदाजांपैकी एक आहे. ज्यांच्याकडे प्रतिभा असूनही, प्रथम कसोटी, नंतर एकदिवसीय आणि नंतर टी-20 फॉरमॅटमधून वगळण्यात आले.
त्याने 22 नोव्हेंबरला टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आपला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर त्याला वगळण्यात आले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला संधी दिली जात नाही, तर BCCI संघात अनेक नवीन गोलंदाजांचा समावेश करत आहे.
आतापर्यंत भारतासाठी 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 63 कसोटी विकेट्स, 141 एकदिवसीय विकेट्स आणि 90 टी-20 विकेट घेतल्या.
भुवनेश्वर हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. पण आता या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपली आहे. तसेच भुवनेश्वरने 2022 साली न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिकेत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.