Ind vs Aus Test Rohit Sharma : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी कामगिरी केली आहे.
कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात 21 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 7वा आणि एकूण 28वा खेळाडू ठरला आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहित शर्मा 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
रोहित शर्माने विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या 17 हजारी क्लबमध्ये सामील झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 664 सामन्यांमध्ये 48.52 च्या सरासरीने 34,357 धावा केल्या. सचिनशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 30 हजार धावांचा आकडा पार करता आलेला नाही.
रोहित शर्माने आतापर्यंत 49 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 46.76 च्या सरासरीने 3365 धावा केल्या आहेत. हिटमॅनने रेड बॉल क्रिकेटमध्ये 9 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्माने 241 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.91 च्या सरासरीने 10,882 धावा केल्या आहेत. टी-20 बद्दल बोलायचे झाले तर, 148 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रोहितने या फॉरमॅटमध्ये 30 च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.