IND vs AUS Test Steve Smith will captain Australia in the fourth with Pat Cummins opting to stay home with his family  
क्रीडा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल! चौथ्या कसोटीला कांगारूं कर्णधार मुकणार

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून कर्णधार बाहेर..

Kiran Mahanavar

India vs Australia 4th Test : ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सलाही अहमदाबादमध्ये भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी त्याची अधिकृत घोषणा केली.

कमिन्स दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत चौथ्या कसोटीत फक्त स्टीव्ह स्मिथ कांगारू संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंदूरमध्ये भारताचा 9 गडी राखून पराभव केला होता. या चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.

भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळायची आहे. पॅट कमिन्स या मालिकेत पुनरागमन करू शकेल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. झी रिचर्डसनच्या रूपाने ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात क्लब क्रिकेटमध्ये त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी नॅथन एलिसचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया कसोटी संघ विरुद्ध भारत - उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनमन, मिचेल स्वीपसन, मॅट रेनशॉ , स्कॉट बोलँड, लान्स मॉरिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT