IND VS AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने भारताची हालत खराब केली. भारताने पहिल्या डावात 66 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर हे नॅथन लायनची शिकार झाले, अशा स्थितीत सर्व चाहत्यांप्रमाणेच माजी क्रिकेटपटू वसीम जाफरलाही ऋषभ पंतची आठवण झाली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पंतची कामगिरी चांगली राहिला आहे, याशिवाय भारताला अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यात पंत पटाईत आहे. अशा स्थितीत त्याचे आठवन करणे अत्यावश्यक आहे. ऋषभ पंतचा फोटो शेअर करताना वसीम जाफरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज मला थोडी फुरसत होती, आज पुन्हा तुझी आठवण आली.'
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघ पहिल्या दिवशी 263 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 81 धावांची खेळी केली. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्बने नाबाद 72 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने 3-3 विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.