Ind vs Aus World Cup Final 2023  sakal
क्रीडा

Ind vs Aus Final : वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित प्लेइंग-11 मध्ये करणार बदल, 'हा' खेळाडू बाहेर?

Kiran Mahanavar

Ind vs Aus World Cup Final 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. टीम इंडिया तब्बल 12 वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळणार आहे.

अशा स्थितीत रोहित शर्माला या सामन्यात एकही चूक करायची नाही. वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी टीम इंडियाचे प्लेइंग 11 हे रोहित शर्मासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. रोहित अंतिम सामना जिंकण्यासाठी प्लेइंग 11 काही बदल करू शकतो. यामुळे अंतिम सामन्यामधून एका खेळाडूला वगळले जाऊ शकते.

'या' खेळाडूला मिळणार संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कांगारू संघाला पराभूत करण्यासाठी योजना आखत असेल. ज्या अंतर्गत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

खरंतर, टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. त्या सामन्यात रोहित शर्माने आर अश्विनचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला होता. मात्र, त्या सामन्यानंतर रोहित शर्माने अश्विनला एकही सामना खेळवला नाही. पण आर अश्‍विनचा ऑस्‍ट्रेलियाविरुद्धचा विक्रम खूपच उत्‍कृष्‍ट राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसारखे खतरनाक फलंदाज अश्विनसमोर खूपच कमजोर दिसतात. अश्विनने अनेक वेळा या दोन्ही फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. याशिवाय अहमदाबादची खेळपट्टी फिरकीसाठी योग्य असेल, तर रोहित शर्मा अतिरिक्त फिरकीपटूसोबत खेळू शकतो. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे अश्विनचा संघात समावेश झाल्यास, टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल.

'या' खेळाडूला जाऊ शकते वगळले

या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. फलंदाज असो वा गोलंदाज, भारतीय संघ प्रत्येक विभागात अप्रतिम कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत जर रोहित शर्माने अश्विनला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी दिली तर सूर्यकुमार यादवला प्लेइंग 11 मधून वगळणे त्याच्यासाठी चांगले होईल.

किंबहुना, संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ते पाहता सूर्याचा संयमी वापर होत असल्याचे दिसते. भारताचे अव्वल फळीतील फलंदाज स्वबळावर सामने पूर्ण करत आहेत. अशा परिस्थितीत त्याला बसवणे हा योग्य निर्णय असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT