Australia's Mitchell Marsh sits with feet on World Cup trophy sakal
क्रीडा

Ind vs Aus : 'याला माज नाही तर काय म्हणायचं…' हातात बीअरची बाटली अन् वर्ल्डकप ट्रॉफी घेतली पायखाली

Kiran Mahanavar

Australia's Mitchell Marsh sits with feet on World Cup trophy : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने चमकदार कामगिरी केली. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना सहज जिंकला.

दरम्यान, अहमदाबादमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अष्टपैलू मिचेल मार्शचा असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्या फोटोमध्ये त्याच्या हातात बीअरची बाटली आणि वर्ल्ड कप ट्रॉफी पायखाली दिसत आहे.

यावर क्रिकेट चाहते जोरदार टीका करत आहेत. मार्श जो 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या संघाचा देखील भाग होता, रविवारी 15 धावा केल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर केएल राहुलने झेलबाद केले.

मात्र, विजयानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला दिसला. त्यावर बरीच टीका होत आहे. चाहत्यांनी ही वागणूक चुकीची ठरवली आणि ट्रॉफीबद्दल काही आदर ठेवला पाहिजे असे म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT