IND vs BAN 1st Test Match sakal
क्रीडा

IND vs BAN: चालू सामन्यात विराट कोहलीचा राग अनावर, पंचांच्या निर्णयावर संतापला

Kiran Mahanavar

IND vs BAN 1st Test Match : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. टीम इंडिया दणदणीत विजयाची नोंद करण्यापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे आणि बांगलादेशला 241 धावांची गरज आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाज विराट कोहली अंपायरच्या निर्णयावर चांगलाच संतापलेला दिसला.

पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. बांगलादेशची पहिली विकेट 124 धावांवर आणि दुसरी 131 धावांच्या स्कोअरवर पडली. अशा स्थितीत भारतीय संघाला सामन्यात टिकण्यासाठी आणखी विकेट्सची गरज होती. यानंतर कुलदीप यादवने धडाकेबाज फलंदाज लिटन दासला आपल्या जाळ्यात अडकवले. पण पंचांच्या निर्णयामुळे तो नाबाद राहिला, त्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला.

खरं तर, बांगलादेशच्या डावाच्या 65 व्या षटकात कुलदीप यादवने लिटन दासला स्टंपसमोर एलबीडब्ल्यू पायचीत केले, परंतु मैदानी पंचांनी भारतीय संघाचे अपील फेटाळले, त्यानंतर टीम इंडियाने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. चेंडू स्टंपला आदळत असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसले, परंतु पंचांच्या निर्णय बदलता आला नाही. या घटनेनंतर विराट कोहली आणि कुलदीप यादव चांगलेच संतापलेले दिसले. कोहली अंपायरशी संभाषण करताना दिसला आणि तो खूप नाराज दिसत होता.

चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने 3 बळी घेतले. त्याचवेळी उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. अशा स्थितीत खेळाच्या शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्याला 241 धावांच्या आत बांगलादेशच्या चार खेळाडूंना बाद करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT