ind vs ban questions on awkward decision in selection eyes on new team india in 2023 
क्रीडा

Team India: बांगलादेश मालिकेतील 'या' निर्णयांमुळे टीम इंडियाची झाली नाचक्की

Kiran Mahanavar

Team India 2023 : दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. यासह भारताने कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. भारतीय क्रिकेटचे हे वर्ष संपले आहे. आता नव्या वर्षात टीम इंडियाचे काय होणार आहे. कारण या मालिकेतील प्लेइंग इलेव्हन बाबतच्या निर्णयांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतीय गोलंदाजांनी दोन्ही कसोटीत 40 विकेट्स घेतल्या, पण विरोधी संघाला शेवटपर्यंत खेळण्याची संधी देत ​​संघ दुसरी कसोटी गमावण्याच्या मार्गावर होता. मात्र अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी 71 धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

मिरपूर कसोटीमध्ये भारताला 145 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. या लक्ष्याचा पाठलाग करताना थोडी आक्रमकता दाखवायला हवी होती. अशा खेळपट्टीवर खूप बचावात्मक खेळण्याची चूक भारताने केली. त्यामुळे बांगलादेशच्या फिरकीपटूंना वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली. त्यामुळे नवीन वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेपूर्वी फलंदाजांच्या खराब कामगिरी आणि निवडीतील मोठी घोडचूक यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सध्याच्या पिढीचे फलंदाज फिरकी खेळू शकत नाहीत. त्यांची कमजोरी पुन्हा उघड झाली आहे. पहिल्या कसोटीत 8 विकेट्स घेऊन 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या कुलदीप यादवला बाद करण्याची चूकही भारताने केली. खेळपट्टीवर तिसरा फिरकी गोलंदाज असल्याने भारताला तिसऱ्या दिवशीच विजय मिळवता आला असता.

केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्या 145 धावांसारखे छोटे टार्गेट चेस करताना बचावात्मक फलंदाजी करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सतत टीकेला सामोरे जाणाऱ्या केएल राहुलने दोन्ही डावात फ्रंटफूटवर खेळताना विकेट गमावल्या आहेत. आता फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचे स्थान निश्चित दिसत नाही. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा बाहेर जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात चुकला आहे. एकूणच पुजाराला पुन्हा एकदा आत्मविश्वास शोधण्याची गरज आहे.

बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर दिसली. मात्र अखेरचा सामना जिंकून संघाने आपली प्रतिष्ठा नक्कीच वाचवली. याआधी न्यूझीलंड दौऱ्यात भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 असा पराभव पत्करला होता. म्हणजेच सलग दोन वनडे मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 अशी जिंकण्यात यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT