हैदराबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची चांगलीच परीक्षा पाहिली. भारताने इंग्लंडचा पहिला डाव चहापानानंतर 246 धावात संपवला. त्यानंतर तिसऱ्या सत्रात एक बाद 119 धावा करत सामन्यावर पकड निर्माण केली. भारत अजूनही 127 धावा पिछाडीवर आहे.
इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावांमध्ये रोखल्यानंतर यशस्वी जयस्वालने भारताला दमदार सुरूवात करून दिली. त्याने 70 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. रोहित शर्मा 24 धावा करून बाद झाला. मात्र या दोघांनी 12 षटकातच 80 धावांची सलामी दिली होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 1 बाद 119 धावा झाल्या होत्या. यशस्वीला साथ देणारा शुभमन गिल 14 धावा करून नाबाद राहिला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 246 धावा केल्या. त्यांचा संघ पहिल्या दिवशी तीन सत्रं देखील फलंदाजी करू शकला नाही. कर्णधार बेन स्टोक्सने झुंजार 70 धावा केल्या म्हणून इंग्लंड द्विशतकी मजल मारू शकला. भारताकडून अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
यशस्वी जयस्वालने भारताला पहिल्या डावाची दमदार सुरूवात करून दिली. त्याने जवळपास 110 च्या स्ट्राईक रेटने धावा करत भारताला दिवस अखेर 1 बाद 119 धावा केल्या. शुभमन गिल 43 चेंडूत 14 धावा करून नाबाद होता.
भारताला पहिला धक्का 80 धावांवर बसला आहे. जॅक लीचला मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात कर्णधार रोहित शर्माने आपली विकेट गमावली. त्याला 27 चेंडूत 24 धावा करता आल्या. यशस्वी जैस्वालने तुफानी फलंदाजी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर तो क्रीजवर आहे.
यशस्वी जैस्वालने 47 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक होते. यशस्वी तुफानी फलंदाजी करत असून त्याने आतापर्यंतच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.
टीम इंडियाची तुफानी सुरुवात झाली आहे. भारताने सहा षटकात 48 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 29 चेंडूत 34 धावा आणि रोहित शर्मा 9 चेंडूत 12 धावा करत फलंदाजी करत आहे.
भारताच्या पहिल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वीने चौकार ठोकला. मार्क वुडच्या चेंडूवर त्याने चौकार मारला. कर्णधार रोहित शर्मा सध्या यशस्वीसोबत क्रीजवर आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 70 धावा करत भारताचे टेन्शन वाढवले होते. मात्र अखेर जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवत इंग्लंडचा पहिला डाव 246 धावात गुंडाळला.
बेन स्टोक्स आणि मार्क वूडने नवव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचत भारताचे टेन्शन वाढवले होते. मात्र अश्विनने वूडला 11 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
बेन स्टोक्सने झुंजार अर्धशतक ठोकत तळातील फलंदाजांना हाताशी घेत इंग्लंडला सन्मानजनक धावांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्याने झुंजार अर्धशतक ठोकले. यामुळे इंग्लंड 234 धावांपर्यंत पोहचला आहे.
चहापानापर्यंत खेळ थांबला तोपर्यंत इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 8 बाद 215 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स 43 धावा करून नाबाद आहे. तर त्याला साथ देणाऱ्या मार्क वूडने 7 धावा केल्या.
भारताने दुसऱ्या सत्रात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर इंग्लंडने 107 धावा केल्या आहेत.
एका बाजूने इंग्लंडचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत असतानाच बेन स्टोक्सने एक बाजू लावून धरत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.
रविंद्र जडेजाने पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टलीला 23 धावांवर बाद केलं. याबरोबरच इंग्लंडची अवस्था 8 बाद 193 धावा अशी झाली.
इंग्लंडचा फिरकीपटू रेहान अहमदने अश्विनला काही आक्रमक फटके मारत झपाट्याने धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराहने त्याला 13 धावांवर बाद करत सातवा धक्का दिला.
इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज बेन फोक्स हा फिरकीला चांगला खेळतो अशी त्याची ख्याती आहे. त्याने श्रीलंकेत शतक देखील ठोकले होते. मात्र अक्षर पटेलने त्याला 4 धावांवर बाद करत इंग्लंडची अवस्था 6 बाद 138 धावा अशी घझाली.
रविंद्र जडेजाने इंग्लंडचा सर्वात भरवशाचा फलंदाज जो रूटला 29 धावांवर बाद केले. यामुळे इंग्लंडची अवस्था 5 बाद 125 धावा अशी झाली आहे.
अक्षर पटेलने इंग्लंडला चौथा झटका दिला आहे. जॉनी बेअरस्टोला क्लीन बोल्ड करत त्याने तंबूत परत पाठवलं आहे. बेअरस्टोने 58 चेंडूंमध्ये 37 रन्स काढल्या होत्या. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. इंग्लंडचा स्कोअर आता 121/4 असा झाला आहे. यानंतर बॅटिंगला बेन स्टोक्स आला आहे.
लंचब्रेकनंतरचा खेळ सुरू झाला आहे. सध्या 30.2 ओव्हरमध्ये इंग्लंडने तीन गडी गमावून 118 धावा केल्या आहेत. जो रूट 23 धावांवर तर जॉनी बेअरस्टो 37 धावांवर खेळत आहे.
लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने तीन गडी गमावून 108 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली.
एकेकाळी 12व्या षटकात एकही विकेट न गमावता 55 धावा झाल्या होत्या, तर 16व्या षटकात संघाने तीन धावा करताना तीन विकेट गमावल्या होत्या. इंग्लंडची धावसंख्या 57 धावांत तीन विकेट्स अशी झाली. डकेट 35 धावा करून बाद झाला आणि ऑली पोप एक धाव काढून बाद झाला. तर क्रॉलीला 20 धावा करता आल्या. डकेट आणि क्रॉलीला अश्विनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी पोपला जडेजाने बाद केले.
सध्या जो रूट 18 आणि जॉनी बेअरस्टो 32 धावांसह खेळत आहेत. दोघांमध्ये 48 धावांची भागीदारी झाली आहे.
एकवेळ 12व्या षटकात इंग्लंडची धावसंख्या एकही विकेट न गमावता 55 धावा होती. आता 16 षटकांत इंग्लिश संघाने 58 वर तीन विकेट गमावल्या आहेत.
भारतीय फिरकीपटू अश्विन आणि जडेजा या जोडीने चार षटकांत टेबल फिरवले. बेन डकेट (35) आणि जॅक क्रोली (20) यांना अश्विनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी ओली पोपला रवींद्र जडेजादाने बाद केले. सध्या जो रूट आणि जॉनी बेअरस्टो मैदानात आहेत.
अश्विनपाठोपाठ हैदराबाद कसोटीतही जडेजाची जादू पाहिला मिळाली. जडेजाने ऑली पोपला आपला शिकार बनवले. जडेजाच्या चेंडूवर रोहित शर्माने ऑली पोपचा अप्रतिम झेल घेतला. पोप 1 धावा करून बाद झाला.
सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंड संघाला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या 'बॅझबॉल' रणनीती ठरली सरस दोघांनी 12 षटकात 55 धावा जोडल्या आहेत.
हे लक्षात घेऊन कर्णधार रोहितने दोन्ही बाजूंनी फिरकीपटू लावले आहेत. रवींद्र जडेजा एका टोकाकडून तर अश्विन दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी सुरू केली. आणि अश्विनने इंग्लंडला त्याच्या दुसऱ्या षटकात मोठा धक्का दिला.
अश्विनने बेन डकेटला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो 39 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 35 धावा करून बाद झाला. सध्या जॅक क्रॉली आणि उपकर्णधार ऑली पोप क्रीजवर आहेत.
इंग्लंडची फलंदाजी सुरू झाली आहे. जॅक क्रॉली आणि बेन डकेट सलामीला आले आहेत. पहिल्या पाच षटकात त्याने 26 धावा केल्या. जॅक क्रॉली 15 तर बेन डकेट 11 धावांवर खेळत आहे. यादरम्यान त्याने 5 चौकार मारले आहे.
इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट हे क्रीझवर आहेत. तर जसप्रीत बुमराहने भारतासाठी पहिले षटक टाकले.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोकस (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टोक्सने आधीच प्लेइंग-11 ची घोषणा केली आहे. संघाने तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरले आहे.
त्याचबरोबर भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांच्या रणनीतीने मैदानात उतरला आहे. कुलदीप खेळत नाही. अक्षर, अश्विन आणि जडेजा हे तीन फिरकीपटू असतील. त्याचबरोबर बुमराह आणि सिराज हे दोन वेगवान गोलंदाज असतील.
कर्णधार रोहित शर्मानेही बुधवारी सांगिलले होते की, खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल. तर अँडरसन आणि वुड सारख्या वेगवान गोलंदाजांवर अवलंबून असलेल्या इंग्लंडने आपला प्लेइंग-11 जाहीर करताना जॅक लीच, टॉम हार्टले आणि लेगस्पिनर रेहान अहमद या तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे. मार्क वुड हा संघात एकमेव वेगवान गोलंदाज असेल. अँडरसनला संघात स्थान मिळवता आलेले नाही.
भारत-इंग्लंड पहिली कसोटी
ठिकाण - आरजीआय स्टेडियम, हैदराबाद
वेळ - सकाळी ९.३० पासून
थेट प्रक्षेपण - जिओ सिनेमा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.