भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्याच कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारताला जमिनीवर आणले. पहिल्या हैदराबाद कसोटीत पाहुण्या इंग्लंडने 28 धावांनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावा करत भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारताचा संपूर्ण संघ 202 धावात गारद झाला.
भारताची अवस्था 7 बाद 119 धावा अशी झाली होती. अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि केएस भरत यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी झुंजार भागीदारी रचत भारताचं आव्हान जिवंत ठेवलं. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली. मात्र पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टलीने दोघांनाही प्रत्येकी 28 धावांवर बाद करत भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवून दिल्या. हार्टलीने 7 विकेट्स घेतल्या.
आठव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचलेल्या अश्विन आणि भरत यांनी दिवसाचा खेळ संपण्यासाठी फक्त दोन षटके राहिले असताना बाद झाले. हार्टलीने भरतला 28 धावांवर बोल्ड केले तर पुढच्याच षटकात हार्टलीने अश्विनला स्टम्पिंग बाद केलं.
रविचंद्रन अश्विन आणि केएस भरत यांनी भारताची डाव सावरत आठव्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी 24 धावांची भागीदारी रचत भारताला 143 धावांपर्यंत पोहचवले. भारताला अजून विजयासाठी 88 धावांची गरज आहे.
भारताचे सात फलंदाज माघारी गेल्यानंतर आता इंग्लंडच्या फिरकीचा सामना करत भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन श्रीकार भारतवर आली आहे. भारताच्या सध्या 7 बाद 131 धावा झाल्या आहेत. विजयासाठी अजून 100 धावांची गरज आहे.
जॅक लिचने श्रेयस अय्यरला 13 धावांवर बाद करत भारताला सातवा धक्का दिला. भारताचा शेवटचा चांगला फलंदाज देखील तंबूत परतला आहे. भारताला अजून 112 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला 3 विकेट्सची गरज आहे.
भारताची आशा रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर यांच्यावर होती. मात्र रविंद्र जडेजा 2 धावा करून धावबाद झाला.
जो रूटने भारताला दुसऱ्या डावात देखील धक्के देणे सुरूच ठेवले. त्याने 22 धावा करून एक बाजू लावून धरलेल्या केएल राहुलला बाद करत भारताला मोठा धक्का दिला.
टी-ब्रेकनंतर टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहे, संघाची चौथी विकेट 95 धावांत पडल्या आहेत. अक्षर पटेल 42 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. टॉम हार्टलेने त्याला आऊट केले. हार्टलेने या डावात इंग्लंडच्या सर्व विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी राहुल आणि श्रेयसची जोडी क्रीझवर आहे.
चौथ्या दिवशी चहापानापर्यंत भारताची धावसंख्या 95/3 आहे. राहुल 21 आणि अक्षर पटेल 17 धावांसह खेळत आहे. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने तिन्ही विकेट घेतल्या. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 136 धावांची गरज आहे.
रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला. त्याला टॉम हार्टलीने बाद केले. हार्टलीने भारताला तीन धक्क दिले आहे. भारत आता 65 धावांवर पोहचला असून विजयासाठी अजून 166 धावांची गरज आहे. केएल राहुल आणि अक्षर पटेल क्रीजवर आले आहेत.
भारताने दमदार सुरूवात केल्यानंतर पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टली भारताला पोठोपाठ दोन धक्के दिले. त्याने यशस्वी जयस्वालला 15 धावांवर तर शुभमन गिलला शुन्यावर बाद केलं.
इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावा करत भारतासमोर विजयासाठी 231 धावांची आव्हान ठेवले. हे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरूवात केली. या दोघांनी पाच षटकात 22 धावा करत जवळपास 5 च्या सरासरी राखली आहे.
जसप्रीत बुमराहने इंग्लंडची शेवटची विकेट ओली पोपला 196 धावांवर बाद करत त्यांचा दुसरा डाव 420 धावांवर संपवला.
रविंद्र जडेजाने इंग्लंडला नववा धक्का दिला. त्याने मार्क वूडला शुन्यावर बाद केलं.
रविचंद्रन अश्विनने अखेर ओली पोप आणि हार्टली यांची 80 धावांची भागीदारी रचणारी जोडी फोडली. त्याने हार्टलीला 34 धावांवर बाद केलं.
इंग्लंडने दुसऱ्या डावात 400 धावांचा टप्पा पार केला असून दुसऱ्या डावात 211 धावांची आघाडी घेतली आहे. ओली पोपने 189 धावांवर खेळत आहे.
ऑली पोप इंग्लंडसाठी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळत आहे. त्याने 178 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आणि आता द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. तर इंग्लंडकडे आता 200 धावांची आघाडी आहे. 93 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 388/7 आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला विकेट मिळवून दिली आहेत. या स्थितीत भारताला विकेटची गरज होती. अशा स्थितीत बुमराहने रेहान अहमदला आऊट केले. ओली पोल अजूनही मैदानात आहे.
जसप्रीत बुमराहच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत इंग्लंडचा उपकर्णधार ओली पोपने 150 धावा पूर्ण केल्या आहेत. या कसोटी सामन्यातील तो आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे.
भारताचे फिरकी अस्त्र निकामी करण्यासाठी स्वीप आणि रिव्हर्स स्वीपची आयुधे वापरणाऱ्या इंग्लिश फलंदाजांनी फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीचा तिसरा दिवस असूनही निष्प्रभ केले. ६ पैकी चारच फलंदाज अश्विन-जडेजा-अक्षर ही त्रयी बाद करू शकली आहे.
जेथे भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा ८० धावा केल्यावर शतकापर्यंत मजल मारू शकले नाहीत तेथे पोप दीड शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तो मैदानात आहे तोपर्यंत इंग्लंडची आघाडी कितीही वाढू शकते आणि ही वाढत जाणारी आघाडी भारतीय संघाला बॅकफूटवर टाकणारी ठरणार आहे.
भारताचे कालचे नाबाद फलंदाज रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना ज्यो रूट या बदली गोलंदाजाची फिरकी खेळणे आज सकाळी कठीण जात होते. इतकेच नव्हे तर धावाही मुक्तपणे फटकावता येत नव्हत्या. जडेजाला ८७ धावांवर बाद केल्यावर रूटने बुमराला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडल्यावर तो हॅट््ट्रिकवर होता. रेहानने अक्षरला बाद केले आणि भारताचा डाव कालच्या ७ बाद ४२१ धावांवरून ४३६ धावांवर संपला. भारताला १९० धावांची आघाडी मिळाली, सकाळी इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभाव पाहता भारतीय फिरकी गोलंदाज कदचित आजच सामना संपवणार असे काही क्षण वाटू लागले होते; परंतु बॅझबॉलचे तंत्र अवलंबणाऱ्या इंग्लिश फलंदाजांनी प्रतिहल्ला करून दिवसअखेर भारतालाच बॅकफूटवर टाकले.
टार्गेट अश्विन
भारताने बुमरा आणि अश्विन असे आक्रमण सुरू केले आणि इंग्लिश सलामीवीर बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी अश्विनला टार्गेट केले. बघता बघता ९ षटकांत ४५ धावांची सलामी फलकावर लागली, पण काही वेळात अश्विनने क्रॉलीला बाद केले. उपाहारापर्यंत भारताला मिळालेले हे एकमेव यश होते.
जडेजाचे ६ नोबॉल
एकीकडे इंग्लंडची आघाडी वाढत असताना भारतीय गोलंदाजांनी २२ अवांतर धावा दिल्या. यात रवींद्र जडेजाने सहा नोबॉल टाकले. सुदैवाने जडेजाने मिळवलेल्या एकमेव विकेटच्या वेळी तो चेंडू नोबॉल नव्हता.
उपाहारानंतर रोहितने बुमराच्या हाती चेंडू दिला आणि त्याला रिव्हर्स स्विंग मिळू लागल्याचे लक्षात आले. डकेट पायचीत होता; परंतु यष्टीरक्षक भरतने डीआरएस घेण्यास मनाई केल्यामुळे तो बाद होता होता वाचला. त्यामुळे निराश झालेल्या बुमराने त्वेषाने मारा केला आणि पुढच्याच षटकात त्याची उजवी यष्टी तिनताड उडवली. आवेशपूर्ण मारा करणाऱ्या बुमराने पुढच्याच षटकात रुटला पायचीत केले. १ बाद ११३ वरून इंग्लंडची ३ बाद ११७ अशी अवस्था झाली.
बुमराने मिळवलेल्या या यशानंतर बेअरस्टॉ, बेन स्टोक्स यांना अनुक्रमे जडेजा आणि अश्विन यांनी फार काळ टिकू दिले नाही. त्यावेळी इंग्लंडची ५ बाद १६३ अशी स्थिती होती. सामन्याची सूत्रे भारतीयांच्या हाती होती, पण पोपने फोक्सच्या साथीत शतकी भागीदारी करत चित्रच बदलले. बघता बघता इंग्लंडकडे शतकी आघाडी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.