विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर संपवला. तत्पूर्वी भारताने आपल्या पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. आता भारताकडे पहिल्या डावात 143 धावांची मोठी आघाडी मिळाली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसअखेर 5 षटकात बिनबाद 27 धावा करत ही आघाडी 171 धावांपर्यंत वाढवली.
भारताने दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात 5 षटकात नाबाद 28 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 171 धावांची आघाडी मिळवली आहे.
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 6 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजींचे कंबरडे मोडले. इंग्लंडचा पहिला डावा 253 धावांवर संपवला. इंग्लंडकडून झॅक क्राऊलने सर्वाधिक 76 धावा केल्या.
रोहितकडून जीवनदान मिळालेला बेन स्टोक्स भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जसप्रीत बुमराहने त्याचा 47 धावांवर त्रिफळा उडवला. भारताची अवस्था 8 बाद 229 अशी झाली.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 45 व्या षटकात कुलदीप यादवने बेन स्टोक्सला एक उत्कृष्ट चेंडू टाकला होता. स्टोक्सही कुलदीपच्या फिरकीत अडकला अन् चेंडू त्याच्या बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेला होता. मात्र रोहित शर्माला हा झेल पकडता आला नाही. स्टोक्सने जीवनदानाचा फायदा उचलत हार्टली सोबत भागीदारी रचली.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने रेहान अहमदला 6 धावांवर बाद करत इंग्लंडला 182 धावात सातवा धक्का दिला.
भारतीय गोलंदाजांनी चहापानानंतर इंग्लंडला दोन धक्के दिले. बुमराहने बेअरस्टोने 25 धावांवर बाद केले. त्यानंतर कुलदीप यादवने बेन फोक्सचा 5 धावांवर त्रिफळा उडवला. इंग्लंडची अवस्था 6 बाद 172 धावा अशी झाली.
155-4 (33 Ov) : दुसऱ्या कसोटीचा दुसऱ्या सामन्याचे दुसरे सत्र हे भारताच्या नावावर राहिले. इंग्लंडने पहिल्या डावात आक्रमक सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर भारताने इंग्लंडला चार धक्के देत चहापानापर्यंत इंग्लंडची अवस्था 4 बाद 155 धावा अशी केली.
जसप्रीत बुमराहने गेल्या सामन्यातील स्टार फलंदाज ओली पोपचा 23 धावांवर त्रिफळा उडवला. बुमराहने जोरदार यॉर्कर टाकत पोपची दांडी गुल केली.
जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला 5 धावांवर बाद केलं. इंग्लंडची अवस्था 3 बाद 123 धावा झाल्या आहेत.
झॅक क्राऊली आणि ओली पोपने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली होती. क्राऊलीने 78 चेंडूत 76 धावा केल्या. अखेर ही जोडील अक्षर पटेलने फोडली. त्याने क्राऊलीला अय्यरकरवी झेलबाद केलं.
इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राऊलीने आक्रमक फटकेबाजी करत इंग्लंडला 20 षटाकत 105 धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडची सरासरी ही जवळपास 5 च्या आसपास आहे.
भारताच्या 396 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने आपला पहिला डाव आक्रमक पद्धतीने सुरू केला. सलामीवीर जॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी 10 षटकात 59 धावांची सलामी दिली. यानंतर कुलदीपने बेन डकेटला 21 धावांवर बाद केले. त्यानंतर जॅक क्राऊलीने आपले अर्धशतक ठोकले.
भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने चांगली सुरुवात केली. सलामीच्या फलंदाजांनी 32 धावा केल्या आहेत. आता लंच ब्रेक झाला आहे.
इंग्लंडची फलंदाजी सुरू झाली आहे. जॅक क्रोली आणि बेन डकेट ही जोडी क्रीझवर आहे. दोघेही चांगल्या गतीने धावा करत असून भारताला ही भागीदारी लवकरच तोडावी लागणार आहे. चार षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 28/0 आहे.
इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाला 400 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. यशस्वी जैस्वालच्या दमदार द्विशतकानंतरही टीम इंडिया 396 धावांवर ऑलआऊट झाली. रेहान अहमद, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसनने 3-3 विकेट घेतल्या.
भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 209 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. 34 धावा करणारा शुभमन गिल संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. पण तो आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले.
यशस्वी जैस्वाल 290 चेंडूत 209 धावा करून आऊट झाला. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि सात षटकार मारले. जेम्स अँडरसनने त्याच्या शिकार केली. सध्या भारताचा स्कोर 383/8 आहे.
यशस्वी जैस्वालने 277 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली.
भारताची सातवी विकेट 364 धावांवर पडली. रविचंद्रन अश्विन 37 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला बेन फॉक्सकरवी झेलबाद केले. आता यशस्वीसोबत कुलदीप यादव क्रीजवर आहे.
यशस्वी जैस्वालने दुसऱ्या दिवसाची पहिली धाव घेतली, त्यानंतर अश्विनने पहिल्याच षटकात चौकार ठोकला.
यशस्वी जैस्वाल 17 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 179 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे. त्याच्या साथीला आर.अश्विन आहे. दुसऱ्या दिवशी आपले द्विशतक पूर्ण करण्याबरोबरच भारताला 500 धावांच्या जवळ नेण्याकडे यशस्वीचे लक्ष असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.