Shami-Bumrah-Welcome 
क्रीडा

Video: शमी-बुमराहचं 'स्वॅग से स्वागत'; शास्त्री गुरूजींही खुश

Video: शमी-बुमराहचं 'स्वॅग से स्वागत'; शास्त्री गुरूजींही खुश ते दोघे ड्रेसिंग रूमकडे येत असताना सारे जण उभे राहू टाळ्या वाजवत होते... Ind vs Eng 2nd Test Day 5 Video Mohd Shami Jasprit Bumrah receives grand welcome form Team India Coach Ravi Shastri watch vjb 91

विराज भागवत

Ind vs Eng 2nd Test Day 5: भारतीय संघाच्या नवव्या आणि दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवले. पहिल्या सत्रात भारताच्या शेपटाने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले. पुजारा आणि रहाणे यांच्या भागीदारीला तोडीस तोड ठरेल अशी भागीदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी केली. पाचव्या दिवशी पंत आणि इशांत झटपट बाद झाल्यावर शमी-बुमहार जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी लंच ब्रेक होईपर्यंत गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळेच उपाहाराच्या विश्रांतीला जेव्हा हे दोघे ड्रेसिंग रूममध्ये गेले तेव्हा दोघांचेही दमदार असं स्वागत झालं.

पुजारा-रहाणे या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला फार काळ मैदानावर तग धरता आला नव्हता. पण पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात मोहम्मद शमीने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. त्याला जसप्रीत बुमराहने झकास साथ दिली. उपाहाराची वेळ होईपर्यंत या दोघांनी मैदान राखत नाबाद ७७ धावांची भागीदारी केली. शमी नाबाद ५२ तर बुमराह नाबाद ३० धावांवर असताना लंच ब्रेक झाला आणि ते ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाले. या दोघांचे अतिशय दिमाखात स्वागत करण्यात आले. कोच रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि सर्व सहकारी उभे राहून आणि टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करताना दिसले. BCCIने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, पाचव्या दिवसाचा खेळ ६ बाद १८१ धावांपासून पुढे सुरू झाला. ऋषभ पंत केवळ ८ धावांची भर घालत २२ धावांवर तो माघारी परतला. इशांत शर्मादेखील काही काळ संघर्ष करून १६ धावांवर पायचीत झाला. त्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज भारताचं शेपूट पटकन गुंडाळणार असं वाटत असतानाच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी धडाकेबाज फलंदाजी केली. बघता बघता त्या दोघांनी अर्धशतकी भागीदारी तर पूर्ण केलीच पण त्यासोबतच मोहम्मद शमीने आपलं अर्धशतकही साजरं केलं. भारताने ८ बाद २९८ धावांवर आपला डाव घोषित केला. बुमराह शमी जोडीने नाबाद ८९ धावांची भागीदारी केली. शमीने नाबाद ५६ तर बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT