Team-India-VVS-Laxman 
क्रीडा

IND vs ENG: VVS लक्ष्मणसोबतच्या 'या' मॅचविनर खेळाडूला ओळखलंत?

विराज भागवत

भारताच्या विजयात 'त्या' खेळाडूचा महत्त्वाचा वाटा

Ind vs Eng 2nd Test: लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत टीम इंडियाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. शेवटच्या दिवशी आधी शमी-बुमराह जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. भारताला शुभेच्छा देताना माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने एक जुना फोटो ट्विट केला. त्यातील एका मुलाच्या भोवती गोल करून त्याने एक जुनी आठवण सांगितली. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मुलाचा हा फोटो असून त्याला लक्ष्मणने खास शुभेच्छा दिल्या.

"मी त्या खेळाडूला पहिल्यांदा खूप पूर्वा हैदराबादचे ज्येष्ठ क्रिकेटपटू अब्दुल अझीम यांच्या घरी भेटलो होतो. या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या जलद गतीने केलेल्या प्रगतीमुळे मला त्याचा अभिमान वाटतो. एखाद्याच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कठीण परिश्रम आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणून यश नक्की मिळवू शकतो याचं सिराज हे एक ठळक उदाहरण आहे. तरूण आणि तडफदार सिराजला माझ्या खूप खूप शुभेच्छा", अशा शब्दात लक्ष्मणने त्याचे कौतुक केले.

भारताकडून दोन्ही डावात मोहम्मद सिराजने अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे तीन दिग्गज गोलंदाज संघात असूनही दोन्ही डावात सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम सिराजने केला. पहिल्या डावात सिराजने ९४ धावांत ४ बळी टिपले. या डावात इशांतने ३ तर शमीने २ बळी टिपले होते. दुसऱ्या डावातही सिराजने सर्वाधिक ४ बळी टिपले. या डावात बुमराहने ३, इशांतने २ तर शमीने १ बळी टिपला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT