Ind vs Eng 3rd Test Rajkot Pitch Report marathi news sakal
क्रीडा

Ind vs Eng 3rd Test : अश्विन-जडेजाच्या तालावर नाचणार इंग्रज? राजकोटच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट आली समोर

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test Pitch Report : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे की, या मैदानावर धावांचा पाऊस पडेल की फिरकी गोलंदाज येथे विकेट्स घेतील.

भारतीय संघाचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत सध्या मिळालेल्या मोठ्या अपडेटमुळे आनंदी होऊ शकतात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी खेळपट्टी दिली जाऊ शकते ज्यावर फिरकी गोलंदाजांना संथ टर्नर मिळेल. एका सूत्राने सांगितले की, भारतीय संघ व्यवस्थापन संथ वळणा-या खेळपट्टीवर खेळण्यास अधिक सोयीस्कर आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 14 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे एका कार्यक्रमात रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करेल. या सोहळ्यात राजकोटच्या स्टेडियमचे नामकरण अनुभवी प्रशासक निरंजन शहा यांच्या नावावर करण्यात येणार आहे.

राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. 2016 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. 2018 मध्ये राजकोट येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 272 धावांनी पराभव केला होता.

या सामन्यात विराट कोहली (139), पृथ्वी शॉ (134) आणि रवींद्र जडेजा (100*) यांनी टीम इंडियासाठी शतके झळकावली. भारताने पहिला डाव 649/9 धावांवर घोषित केला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 181 आणि दुसऱ्या डावात 196 धावांत गुंडाळले होते.

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT