ind vs eng head to head sakal
क्रीडा

Ind vs Eng : T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-इंग्लंड तीनदा भिडले; कोणाचं राहिलं वर्चस्व?

इंग्लंड विरुद्ध T20 विश्वचषकात भारताचा विक्रम आहे तरी कसा जाणून घ्या....

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Eng Head to Head T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 मधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा अंतिम सामना आज होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या इराद्याने उतरणार आहे. टीम इंडियाने शेवटचा टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये जिंकला होता. यावेळी टीम इंडियाला हा दुष्काळ संपवायचा आहे. त्याचवेळी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी जाणून घेऊया दोन्ही संघांचे हेड टू हेड आकडे पाहु...

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडने 10 सामने जिंकले आहेत. 2022 मध्ये दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला होता. त्याचबरोबर या सामन्यातही टीम इंडियाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 3 सामने खेळल्या गेलं आहेत. येथेही टीम इंडियाने 2 विजयांसह आघाडी घेतली आहे. दोघांमध्ये पहिला सामना 2007 मध्ये झाला होता. यामध्ये टीम इंडियाने 18 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडवर 6 षटकार मारत 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने 3 धावांनी विजय मिळवला होता. 2012 मध्ये टी-20 वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवट भिडले होते. या सामन्यात भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT