IND vs ENG  E Sakal
क्रीडा

IND vs ENG 3rd Test: पुजाराला बाकावर बसवून SKY ला पदार्पणाची संधी मिळणार?

दुसरीकडे भारतीय संघातील चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.

सुशांत जाधव

England vs India, 3rd Headingley, Leeds Test India Predicted XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून रंगणार आहे. लीड्सच्या मैदानात लीड भक्कम करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरण्यास उत्सुक असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानात पिछाडीवरुन 151 धावांनी विजय नोंदवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दोन्ही संघातील बर्मिंघमच्या मैदानातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या इंग्लंडच्या संघात मोठा बदल दिसू शकतो. क्रिकेटच्या पंढरीत पाच विकेट घेणारा मार्क वूडने दुखापतीमुळे माघार घेतली असून सलामीचा फलंदाज डॉम सिब्लेच्या जागी डेविड मलानला इंग्लंडकडून संधी दिली जाईल.

मलानने तीन वर्षांपूर्वी अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. पण त्याच्याकडे प्रथम श्रेणीचा चांगला अनुभव आहे. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा मलान तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकते. या परिस्थितीत हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स इंग्लंडच्या डावाची सुरुवात करतील. मार्क वूडच्या जागी इंग्लंडकडे सादिक महमूदला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने 7 वनडे आणि 9 टी20 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.

दुसरीकडे भारतीय संघातील चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. पुजाराच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळावी, अशी चर्चाही पाहायला मिळते. जर सूर्यकुमारला संधी मिळाली तर इंग्लंड विरुद्ध तो पदार्पणाचा सामना खेळताना दिसेल. पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील कामगिरीत सातत्याचा अभाव गेल्या काही सामन्यात दिसून आला असला तरी लॉर्ड्सच्या मैदानात या जोडीने केलेल्या 100 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली होती. या शतकी भागीदारीनेच टीम इंडियाचा पाया मजबूत केला होता. त्यामुळे पुजाराच्या जागी सूर्यकुमारला खेळवण्याचा निर्णय विराट आणि टीम मॅनेजमेंट घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या सामन्यात आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. त्यानंतर आता त्याला कसोटीतही संधी द्यावी, असे मत काही माजी क्रिकेटपटूंनीही बोलून दाखवले आहे. पुजारा किंवा रहाणे या दोघांपैकी एकाच्या जागी त्याला लीड्सच्या मैदानात उतरावे, असा मतप्रवाह दिसतोय. सूर्यकुमार यादवला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव नाही हीच त्याची कमकूवत बाजू आहे.

हेडिंग्लेची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना अनुकूल मानली जात आहे. त्यामुळे भारतीय संघ चार जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. रविंद्र जडेजाच्या जागी अश्विनला पाचव्या गोलंदाजाच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. शार्दुल ठाकुर फिट असला तरी त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे.

भारताचा संभाव्य संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा/ सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT