Rahul Dravid Celebration Video Goes Viral: एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली. ऋषभ पंतने कसोटी कारकिर्दीतील 5 वे शतक पूर्ण केले. पंतने 111 चेंडूत 146 धावांची तुफानी खेळी केली. त्याने खेळीत 20 चौकार आणि चार षटकार मारले. पंतच्या शतकानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने ज्या पदतीने सेलिब्रेशन केले चाहते थक्क झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
पंतने आपल्या खेळीने प्रशिक्षकांचे मन जिंकले. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर 2 धावा काढून पंतने शतक पूर्ण केले. अशा स्थितीत एजबॅस्टनच्या बाल्कनीत बसलेला द्रविड उभा राहिला आणि दोन्ही हात वर करून बाहुबली सेलिब्रेशन करताना दिसला.
इंग्लंड दौऱ्यावर चार वर्षांपूर्वी ओव्हलच्या मैदानावर पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने आत्तापर्यंत पाच शतके झळकावली असून त्यापैकी 4 विदेशी मैदानावर झळकावली आहेत. पंतने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 159*, अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध 101, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर या वर्षी नाबाद 100 आणि नंतर एजबॅस्टन येथे 146 धावा केल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पंतने सर्व शतके केले आहे. पंत आता निर्णायक सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळत आहे
पंतच्या जोरदार खेळीमुळे भारतीय संघाला पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात 7 बाद 338 धावा करता आल्या. पंत आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी केली. पंत इंग्लंडच्या भूमीवर दोन शतके झळकावणारा पहिला यष्टिरक्षक बनला आहे. याआधी पंतने 2018 मध्ये ओव्हलवर शतक झळकावले होते. पंतने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.