फलंदाजाला काहीही कळायच्या आतच चेंडू सपकन आतमध्ये आला अन्..
Ind vs Eng 4th Test: इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने यजमानांना ३६८ धावांचे मोठे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांचा कस लागला. इंग्लंडने पहिल्या सत्रात ५४ धावांची भर घातली, तर भारताला केवळ दोन बळी घेतला आले. पण त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या तासाभराच्या खेळातच भारतीयांनी चार बळी टिपले. त्यापैकी जसप्रीत बुमराहने जॉनी बेअरस्टोचा उडवलेला त्रिफळा विशेष आकर्षण ठरला.
दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला रविंद्र जाडेजाने हसीब हमीदला तर बुमराहने ओली पोपला झटपट माघारी धाडले. त्यानंतर आलेला जॉनी बेअरस्टो चौथा चेंडू खेळत होता. जसप्रीत बुमराहने अतिशय वेगवान आणि अचूक यॉर्कर चेंडू टाकत बेअरस्टोला माघारी धाडले. आधीचे ३ चेंडू बेअरस्टोला चांगल्या पद्धतीने खेळता आले नव्हते. तशातच खेळपट्टीवर नवीन असताना त्याला अचानक बुमराहच्या वेगवान अशा यॉर्करचा सामना करणं निव्वळ अशक्य ठरलं. काही समजेपर्यंत तो क्लीन बोल्ड झाला आणि शून्यावर माघारी परतला.
जॉनी बेअरस्टो माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अली फलंदाजीसाठी आला होता. पण रविंद्र जाडेजाने त्यालाही चार चेंडूत शून्यावर माघारी धाडले. पण त्याने जो रूट आणि ख्रिस वोक्स या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.