चौथा डाव सुरू होण्याआधी काय घडलं, व्हिडीओ झाला व्हायरल
Ind vs Eng 2nd Test: भारतीय गोलंदाजांनी लॉर्ड्सच्या मैदानावर अप्रतिम मारा करत संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. पाचव्या दिवशी आधी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकवण्यास भाग पाडले. २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत आटोपला. इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी झटपट बाद करण्यामागचं मूळ कारण काय, हे आता समोर आलं आहे.
विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली इंग्लंडचा दुसरा डाव सुरू होण्याआधी मैदानात भारतीय खेळाडूंशी बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओबद्दल नीट पाहिल्यावर समजलं की विराटने भारतीय खेळाडूंनी वॉर्निंग देऊन ठेवली होती. विराटने खेळाडूंच्या टीम हडलमध्ये असताना सांगितले होते, "जर तुमच्यापैकी कोणीही मला मैदानावर खेळताना हसताना दिसलं तर त्याची गाठ थेट माझ्याशी असेल. पुढच्या ६० ओव्हर्सचा खेळ हा इंग्लंडच्या खेळाडूंसाठी अतिशय कठीण आणि कसोटीचा असाच असायला हवा. नरकयातनांचे दु:ख जितके तीव्र असू शकते त्यापद्धतीची गोलंदाजी आपल्या गोलंदाजांनी करायला हवी", अशी सक्त ताकीदच विराटने साऱ्यांनी दिली होती आणि त्यानुसार शिस्तबद्ध गोलंदाजी व फिल्डिंगचे भारतीय संघाला फळ मिळाले.
असा रंगला 'लॉर्ड्स'वरील सामना
पहिल्या डावात इंग्लंडने भारतावर २७ धावांनी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताकडून पुजारा-रहाणे आणि शमी-बुमराह जोडीने दमदार भागीदारी केल्या. त्यामुळे इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान देण्यात आले. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने क्रिकेटच्या पंढरीत विजयी जल्लोष साजरा केला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील १५१ धावांच्या विजयासह संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. सिराजने ४, बुमराहने ३, इशांतने २ आणि शमीने एक बळी टिपला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.