Virat Kohli Injured SAKAL
क्रीडा

ENG vs IND: विराट कोहली पहिल्या वनडेतून बाहेर?

विराट कोहली ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मुकणार

Kiran Mahanavar

Virat Kohli Injured : विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. त्याची खराब कामगिरी पाहता अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्याला ब्रेक घेण्याता सल्ला दिला आहे तर काहींनी त्यांला संघातून बाहरे काढा असा सल्ला दिला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार कोहलीला तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान मांडीला दुखापत झाली असून तो ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मुकणार असे दिसत आहे.(virat kohli may be out of first odi against england groin injury)

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये विराटला केवळ 12 धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्यावर आधीच भरपूर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आशा त्याला जास्त दुखापत झाली तर त्याचे खेळणे अवघड होईल. सूत्रांनी सांगितल्यानुसार, कोहलीच्या दुखापतीचे तपशील माहित नाहीत परंतु भारतीय संघ व्यवस्थापन त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती देऊ शकते जेणेकरून तो 14 जुलै आणि 17 जुलै रोजी होणार्‍या पुढील दोन सामन्यांसाठी उपलब्ध राहील.

नॉटिंगहॅमहून लंडनला कोहली टीम बसने आला नसल्याचे पण कळत आहे. यामागे वैद्यकीय तपासणी हे कारण असू शकते. सोमवारी केवळ एकदिवसीय संघासाठी निवडलेले खेळाडू, शिखर धवन, शार्दुल ठाकूर आणि प्रमुख कृष्णा यांनी सराव सत्रात भाग घेतला होता. त्यामुळेच वेस्ट इंडिज सामन्यांच्या पाच टी-20 मालिकेसाठी संघाची निवड आता मंगळवारी होणार आहे.

भारतीय कॅम्पच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत विश्रांतीची मागणी केली आहे. दरम्यान बीसीसीआयने कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ मँचेस्टरहून चार्टर्ड विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT