ING vs ENG E Sakal
क्रीडा

IND vs ENG : इंजी भाईनं सांगितला 'विराट' दुखापतीचा इलाज

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनीही भारताच्या निराशजनक कामगिरीचे खापर हे रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांवर फोडले आहे.

सुशांत जाधव

Virat Kohli Under Pressure says Inzamam Ul Haq: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झालीये. भारतीय संघाचा पहिला डाव 78 धावात आटोपल्यानंतर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 432 धावा करत भक्कम आघाडी घेतली आहे. लीड्सच्या मैदानात भारतीय संघ मोठ्या अंतराने पिछाडीवर असण्यामागे आघाडीचे फलंदाज कारणीभूत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनीही भारताच्या निराशजनक कामगिरीचे खापर हे रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांवर फोडले आहे.

रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या डावात भारताकडून सर्वोच्च 19 धावासंख्या केली होती. दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) अवघ्या 7 धावांवर माघारी परतला होता. सातव्यांदा तो अँडरसनच्या जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत 4 डावात 69 धावा केल्या आहेत. कोहलीच्या या कामगिरीवर इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर दबावात खेळताना दिसत आहे. त्याने स्वत:वर घेतलेल्या दबावामुळे त्याची कामगिरी खालावली आहे, असे मत इंझमाम यांनी व्यक्त केले आहे.

इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरील ‘द मॅच विनर’ या कार्यक्रमात भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर भाष्य केले. ते म्हणाले की विराट कोहली जगातील अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. पण इंग्लंड दौऱ्यावर तो आपल्या शैलीत खेळताना दिसत नाही. दबावात खेळत असल्यामुळे त्याच्याकडून चुका होत आहेत. त्याच्या चुकामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढणे स्वाभिविकच आहे, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

इंझमाम उल हक यांनी किंग कोहलीला खास सल्लाही दिलाय. मैदानात बॅटिंगसाठी उतरल्यानंतर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन आहे हा विचार डोक्यातून काढून टाकायला हवा. यामुळे त्याला आपली नैसर्गिक खेळी करणे सहज सुलभ होईल. त्याच्या बॅटमधून पूर्वीसारख्या धावा निघताना पाहायला मिळेल, असे इंझमाम यांनी म्हटले आहे. यावेळी इंजी भाईने इंग्लंड कर्णधारावरही कौतुकाचा वर्षाव केला. टॉस गमावल्यानंतर इंग्लंडने भारतीय संघाला 78 धावांत आटोपून सामन्यावर वर्चस्व मिळवले. जो रुटच्या शतकी खेळीनं इंग्लंडने सामन्यात भक्कम आघाडी घेतली. रुट सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, असे इंझमाम उल हक यांनी म्हटले आहेय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT