Jasprit Bumrah  ESAKAL
क्रीडा

Jasprit Bumrah : बुमराह पुन्हा दुखापतीतून थोडक्यात बचावला! कसा टळला मोठा अपघात, पाहा Video

सकाळ ऑनलाईन टीम

Jasprit Bumrah IND vs IRE : भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला, ज्या भारताने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

त्याचवेळी, या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह दुखापतीतून थोडक्यात बचावताना दिसत आहे.

आयर्लंड दौऱ्यावर बुमराहने तब्बल 11 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन केले. यापूर्वी बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रियाही झाली. अशा परिस्थितीत आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी त्याचे पुनरागमनने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी, मेगा टूर्नामेंटपूर्वी टीम इंडिया त्याच्या दुखापतीचा धोका पत्करू शकत नाही. बुमराह हा संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.

दुसरीकडे, व्हिडिओबद्दल बोलायचे झाल्यास, बुमराह चौकार रोखण्यासाठी चेंडूच्या मागे धावताना दिसत आहे आणि दूसरीकडून रवी बिश्नोई येताना दिसत आहे. दरम्यान, बुमराहही त्याच्या अगदी जवळ आला होता आणि तो बिश्नोईशी टक्कर देणार होता, पण तेव्हा भारतीय कर्णधाराने समजूतदारपणा दाखवत बिश्नोईवर उडी मारली आणि दोघांनाही दुखापत होण्यापासून वाचवले. बुमराहला पुन्हा एकदा दुखापत झालेला पाहणे भारतीय चाहत्यांना आवडणार नाही.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 20 ऑगस्ट रविवारी खेळला जाणार आहे. सायंकाळी साडेसातपासून सामना सुरू होईल. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता द व्हिलेज येथे होणारा दुसरा सामना जिंकून जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील संघाला भारताची मालिका आपल्या नावावर करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT