ind vs ire team india-will-tour-ireland-in-august-three-match-t20-series-will-be-played-know-2023 
क्रीडा

IND vs IRE : मोठी घोषणा! टीम इंडिया पुन्हा जाणार आयर्लंड दौऱ्यावर, हार्दिक पांड्या होणार कर्णधार?

Kiran Mahanavar

Team India Will Tour Ireland : भारतीय क्रिकेट संघ या वर्षी ऑगस्टमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. क्रिकेट आयर्लंडने आज ही माहिती दिली. ऑगस्टमध्ये भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. हे सामने 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान मलाहाइड येथे खेळल्या जाईल जाईल.

यानंतर भारतीय संघ इंग्लंडला जाऊन तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.

क्रिकेट आयर्लंडने शुक्रवारी 2023 चे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केले. यादरम्यान संघ भारत आणि बांगलादेशविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार आहे. आयरिश संघ बांगलादेशचा दौरा करेल आणि 18 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत सर्व फॉरमॅटमध्ये सामने खेळेल. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि एकमेव कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

क्रिकेट आयर्लंडने म्हटले आहे की, "आयर्लंडमधील क्रिकेट चाहत्यांना भारत, जगातील नंबर वन टी-20 आंतरराष्ट्रीय संघ पाहण्याचा आनंद घेता येईल, जेव्हा आशियातील अव्वल खेळाडू या ऑगस्टमध्ये मलाहाइडला तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी परततील." भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने गेल्या वर्षी याच ठिकाणी दोन सामन्यांच्या मालिकेदरम्यान संघाचे नेतृत्व केले होते.

भारताला यंदा एकदिवसीय विश्वचषक त्याच्याच भूमीवर खेळायचा आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हार्दिक पांड्याला विश्वचषकाच्या तयारीत विशेष महत्त्व नसलेल्या मालिकेत खेळवण्याची जोखीम पत्करणार का हे पाहावे लागेल.

तथापि आयर्लंड क्रिकेट बोर्डासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे कारण तिच्या त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. ही मालिका 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

SCROLL FOR NEXT