India Vs Netherlands Score World Cup 2023  
क्रीडा

IND vs NED Score : टीम इंडियासाठी शुभ दिपावली! 9 पैकी 9 मॅच जिंकत दिमाखात खेळणार सेमीफायनल

Kiran Mahanavar

India Vs Netherlands Score World Cup 2023 : सुपर संडेमध्ये आज वर्ल्ड कप 2023 चा शेवटचा सामना भारत विरुद्ध नेदरलँड यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 9वा विजय नोंदवला. या संघाने रविवारी गट फेरीतील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला.

स्पर्धेतील 45 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 गडी गमावत 410 धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने शतके झळकावली. रोहित, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनीही अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 250 धावा करून सर्वबाद झाला.

भारतीय संघ 15 नोव्हेंबरला पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.

जबरदस्त...! विराट कोहलीने घेतली विकेट, विरोधी कर्णधाराला पाठवले तंबूत

नेदरलँडची चौथी विकेट 111 धावांवर पडली आहे. विराट कोहलीने विरोधी कर्णधाराला आऊट केले. स्कॉट एडवर्ड्स 30 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.

IND vs NED Live Score : जडेजाचा कहर...! पहिल्याच चेंडूवरच घेतली विकेट अन्...

72 धावांवर नेदरलँडची तिसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.

66 धावांवर नेदरलँडची पडली दुसरी विकेट

66 धावांवर नेदरलँडची दुसरी विकेट पडली आहे. अकरमन 32 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले.

मोहम्मद सिराजने नेदरलँडला दिला पहिला धक्का

भारताकडून डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकात वेस्ली बरेसीला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारताने नेदरलँड्ससमोर ठेवले 411 धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 410 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद 128 धावा केल्या. राहुलने 102 धावांची खेळी केली. कर्णधार रोहितने 61 आणि गिल-कोहलीने 51 धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या.

राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. नेदरलँड्सकडून जस्ट डी लीडेने दोन बळी घेतले. मीकरेन आणि मर्व्ह यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

राहुलने ठोकले शतक!

राहुलने 64 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने शानदार खेळी केली आहे. त्याचे हे वर्ल्ड कपमधील पाचवे जलद शतक आहे.

क्या बात है...! श्रेयस अय्यरने ठोकले वर्ल्ड कपमधील पहिले शतक

श्रेयस अय्यरने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. वर्ल्ड कपमधील त्याचे हे पहिलेच शतक आहे.

भारतीय टॉप-ऑर्डरच्या ५ फलंदाजांनी ठोकले ५ अर्धशतक... अय्यरची शतकाकडे वाटचाल

भारताच्या धावसंख्येने तीन गडी गमावून 300 धावा पार केल्या आहेत. या सामन्यात भारतीय टॉप-ऑर्डरच्या ५ फलंदाजांनी अर्धशतक केले आहेत. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. दोघेही फलंदाजी करत वेगाने धावा करत आहेत. राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले असून श्रेयस शतकाच्या जवळ आहे.

राहुल-श्रेयसची चांगली भागीदारी

लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या गतीने धावा करत आहेत आणि टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. 40 षटकांनंतर भारताची धावसंख्या 284/3 आहे.

 श्रेयस अय्यरनेही ठोकले अर्धशतक! 

श्रेयस अय्यरने 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने शानदार फलंदाजी करत टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले आहे. भारताला 300 हून अधिक धावा करण्याची संधी आहे.

अर्धशतक ठोकल्यानंतर 'किंग' कोहली आऊट!

विराट कोहली नेदरलँडविरुद्ध 51धावा करून आऊट झाला आहे. त्याने 56 चेंडूंचा सामना केला. 5 चौकार आणि एक षटकार मारला. स्कोअर 3 विकेटवर 200 धावा.

कर्णधार रोहित आऊट

129 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा 54 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 61 धावा करून बाद झाला.

18 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा आहे.

कर्णधार रोहित शर्माने ठोकले अर्धशतक

रोहित शर्माने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विराटसोबत त्याची चांगली भागीदारी चालू आहे. भारताची धावसंख्या 120 धावांच्या पुढे गेली आहे.

भारताला पहिला धक्का, अर्धशतक झळकावल्यानंतर शुभमन गिल आऊट

भारताने 100 च्या एकूण धावसंख्येवर पहिला विकेट गमावला. शुभमन गिल 51 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर निदामनुरूच्या चेंडूवर मिकरनकरवी झेलबाद झाला.

पॉवरप्लेमध्ये भारताने केल्या 91 धावा...!

भारताने प्रथम फलंदाजी करत आक्रमक सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 91 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघेही अर्धशतकांच्या जवळ आहेत.

रोहित अन् गिलकडून बंगळुरूमध्ये षटकार-चौकारचा पाऊस!

भारताने 5 षटकात 50 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दोन्ही सलामीवीर नेदरलँड्सच्या गोलंदाजांना झोडपून काढत आहेत.

भारताची शानदार सुरुवात

प्रथम फलंदाजी करताना भारताने चांगली सुरुवात केली आहे. रोहित शर्मा वेगाने धावा करत आहे. त्याचवेळी शुभमन गिल सावध खेळत आहे. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या 26/0 आहे.

दिवाळीत बंगळुरूमध्ये पडणार धावांचा पाऊस! नेदरलँडविरुद्ध भारताने जिंकली नाणेफेक अन्...

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने संघात कोणताही बदल केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT