Ind vs Nz Arshdeep Singh : भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी सध्याचा काळ काही चांगला राहिला नाही. सतत नो बॉल फेकल्यामुळे भारताला निश्चितच अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात अनेक नो बॉल टाकले. त्याचवेळी शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याचा पाय पुन्हा रेषेच्या बाहेर गेला.
अर्शदीपने अखेरच्या षटकात दिलेल्या तब्बल 27 धावा, यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या. या आव्हानासमोर भारताला 9 बाद 155 धावाच करता आल्या. अर्शदीपने चार षटकांच्या स्पेलमध्ये 51 धावांत केवळ एक विकेट घेतली. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद कैफने अर्शदीपच्या गोलंदाजीची सर्वात मोठी चुक सांगितली.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद कैफने सांगितले की, अर्शदीपचे रनअप त्याच्यासाठी कठीण आहे. तो खूप लांबवरून धावत येतो, ज्यामुळे तो अडचणीत का पडतो हे स्पष्ट होते. त्या धावपळीत तो आपली बरीच ऊर्जा खर्च करतो. त्याच्या नो बॉलमागे हेच कारण आहे. तो आपली बाजूही खूप बदलतो, कधी राउंड द विकेट, कधी काहीतरी. त्यांचा स्वतःवर विश्वास असायला हवा.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना संजय बांगर म्हणाला, 'अर्शदीप आज काही खास करू शकला नाही. तो यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जातो पण आज त्याला तसे करता आले नाही. मला वाटते की त्याने त्याच्या गोलंदाजीचा विचार करणे आवश्यक आहे जेणेकरून तो योग्य निर्णय घेऊ शकेल. तुम्हाला तुमच्या मूलभूत गोष्टींवर काम करावे लागेल. जर त्यांनी हे सर्व केले तर ते अधिक चांगले होऊ शकतात. मीही कैफशी सहमत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.