IND vs NZ Live Score 
क्रीडा

IND vs NZ : विराटचं शतक हुकलं मात्र 2019 चा बदला घेत गुणतालिकेत पटकावलं अव्वल स्थान

Kiran Mahanavar

India vs New Zealand World Cup 2023 Live Cricket Score Today : भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्स राखून पराभव करत भारताने यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये 2019 च्या पराभवाचा वचपा काढळा. त्याचबरोबर भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

न्यूझीलंडचे 274 धावांचे आव्हान पार करताना विराट कोहलीने आपले वनडे कारकिर्दीतले 49 वे शतक पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र शतकासाठी आणि विजयासाठी 5 धावांची गरज असताना विराट झेलबाद झाला. विराटला साथ देणाऱ्या विराटने नाबाद 39 धावा केल्या.

वर्ल्डकप 2023 च्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात डॅरेल मिचेलच्या शतकी खेळीच्या जोरावर किवींनी 273 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेत आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने देखील 75 धावांचे योगदान दिले. तर भारताकडून कुलदीप यादवने 2 तर सिराज आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विराट - जडेजाची अर्धशतकी भागीदारी 

विराट कोहली आणि रविंद्र जेडजा यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. त्याच्या जोरावर अडचणीत सापडलेल्या भारताला बाहेर काढत विराट कोहली आणि जडेजाने भारताला विजयी मार्गावर नेले.

IND 228/5 (40.3) : विराट कोहलीने डाव सावरला

केएल राहुलने 27 आणि सूर्यकुमारने 2 धावा करत विराटची साथ सोडली. मात्र चेस मास्टार विराट कोहलीने रविंद्र जडेजाला हाताशी घेत डाव सावरला. विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

158-3 (28.2 Ov) : अय्यर झाला बाद, विराटने सावरला डाव 

आक्रमक फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर 29 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारताला 27 व्या षटकात दीडशतकी मजल मारून दिली.

श्रेयस अय्यरची आक्रमक फलंदाजी मात्र खराब हवामानामुळे खेळ थांबला

शुभमन गिल बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आपला दांडपट्टा सुरू केला. त्याने 9 चेंडूतच 21 धावा ठोकत भारताचे शतक 16 व्या षटकात धावफलकावर लावले.

IND 76/2 (13.3) : भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये 

भारतीय सलामीवीर विराट कोहली आणि शुभमग गिलने 71 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर 40 चेंडूत 46 धावा करणाऱ्या रोहित शर्माला आणि 31 चेंडूत 26 धावा करणाऱ्या शुभमन गिलला लॉकी फर्ग्युसनने बाद केले.

52-0 (7.4 Ov) : भारताचं अर्धशतक 

न्यूझीलंडचे 274 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने दमदार सुरूवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आठव्या षटकातच भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले.

260-8 ं: शामीचा जलवा 

मोहम्मद शामीने स्लॉग ओव्हरमध्ये देखील आपला जवला दाखवत किवींच्या फलंदाजीला मोठं भगदाड पाडलं. बुमराहने कॅम्पमनला बाद केल्यानंतर शामीने सँटनर आणि हेन्रीचा पाठोपाठच्या चेंडूवर त्रिफळा उडवला. शामीची ही चौथी शिकार होती.

243-5 : कुलदीपने दिला अजून एक धक्का

मिचेलच्या शतकानंतर ग्लेन फिलिप्स सोबतची त्याची भागीदारी मोठी होत होती. तेवढ्यात कुलदीप यादवने 45 व्या षटकात ग्लेन फिलिप्सला 23 धावांवर बाद करत कांगारूंना पाचवा धक्का दिला.

222-4 (40.5 Ov) डॅरेल मिचेलचे आक्रमक शतक 

रचिन बाद झाल्यानंतर डॅरेल मिचेलने 101 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने 40 षटकात 222 धावांपर्यंत मजल मारली.

205-4 (36.4 Ov) : कुलदीपने दिला चौथा धक्का 

रचिन बाद झाल्यानंतर कुलदीप यादवने कर्णधार टॉम लॅथमला 5 धावांवर बाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला.

NZ 178/3 (33.3) : मोहम्मद शमी आला धावून 

रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 152 चेंडूत 159 धावांची भागीदारी रचली अखेर 75 धावा करणाऱ्या रचिनला मोहम्मद शमीने बाद करत ही जोडी फोडली. शमीची ही दुसरी शिकार ठरली.

NZ 167/2 (32) : रचिनची शतकाकडे कूच 

डावखुऱ्या रचिन रविंद्रने डॅरेल मिचेल सोबत जवळपास दीडशतकी भागीदारी रचत न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. रचिन देखील शतकाच्या जवळ पोहचला आहे.

NZ 110/2 (22.3) : रविंद्रचे अर्धशतक 

रचिन रविंद्रने दमदार अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला शतकी मजल मारून दिली. त्याला डॅरेल मिचेलने देखील चांगली साथ दिली.

61-2 (15 Ov) : न्यूझीलंडचे अर्धशतक पूर्ण 

मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने न्यूझीलंडला दोन धक्के दिल्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

IND vs NZ Live Score : वर्ल्ड कप 2023च्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद घेतली पहिली विकेट

IND vs NZ Live Score : चौथ्या षटकात सिराजने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का! डेव्हॉन कॉनवे तंबूत

चौथ्या षटकात नऊ धावसंख्येवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. सिराजने डेव्हॉन कॉनवेला आऊट केले. सध्या विल यंग आणि रचिन रवींद्र क्रीजवर आहेत.

4 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या एका विकेटवर नऊ धावा आहे.

दोन्ही संघातील प्लेइंग 11

भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, राहुल , सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

IND vs NZ Live Score : न्यूझीलंडविरुद्ध भारताने जिंकली नाणेफेक! गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दोन बदल केले आहेत. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव, तर शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमी आला आहे.

टीम इंडिया न्यूझीलंडकडून घेणार बदला...!

2003 च्या विश्वचषकापासून टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामने किवी संघाने जिंकले. तर 2019 एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याच न्यूझीलंडने 2019 च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT