IND vs NZ World Cup 2023 Rohit Sharma : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया आतापर्यंत एक चॅम्पियन टीमसारखी खेळली आहे. भारताने पहिल्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा, तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा, चौथ्या सामन्यात बांगलादेशचा आणि आता पाचव्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
या सामन्यातून विराट कोहलीला रन चेज मास्टर का म्हटल्या जाते ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सामन्यानंतर रोहित शर्माला त्याची क्षमता आणि टीम इंडियाच्या विजयाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, विराटला आता याची सवय झाली आहे. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही स्पर्धेची चांगली सुरुवात केली आहे. अर्धे काम पूर्ण झाले आहे. आता फक्त समतोल राखणे महत्त्वाचे आहे. एखाद्याने खूप पुढे विचार करू नये. खेळात टिकून राहणे महत्त्वाचे आहे.
रोहितने या स्पर्धेचा पहिला सामना खेळलेल्या मोहम्मद शमीचे कौतुक करताना म्हटले की, शमीने ही संधी दोन्ही हातांनी स्वीकारली. त्याला या परिस्थितीत अनुभव आहे आणि तो एक दर्जेदार गोलंदाज आहे. एके काळी मला वाटत की स्कोअर 300 पेक्षा जास्त होईल. पण अंतिम षटकात आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
रोहित त्याच्या फलंदाजीवर म्हणाला की, मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे. आनंद झाला की आम्ही जिंकलो. विराट कोहलीबद्दल बोलताना रोहित म्हणला की, ही त्याची सवय आहे. मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण तो वर्षानुवर्षे संघासाठी अशी कामगिरी करत आहे. त्यासाठी तो स्वत:ला तयार करतात आणि नंतर मैदानात त्याची अंमलबजावणी करतात.
रोहितने क्षेत्ररक्षणाबद्दलही बोलले कारण भारताने काही झेल सोडले जे आतापर्यंत स्पर्धेत पाहिले नव्हते. कर्णधार म्हणाला की, क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. आज क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. जडेजाने सुरुवातीला रचिन रवींद्रचा झेल सोडला. आम्हाला माहित आहे की क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट आहे जी भविष्यात सुधारेल. भारताचा पुढील सामना रविवारी 29 ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.