IND vs NZ Semi Final 
क्रीडा

IND vs NZ Semi Final: "इतिहासाने फरक नाही पडत आमची नजर..."; सेमीफायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्माचे मोठं वक्तव्य

रोहित शर्माने आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले

Sandip Kapde

IND vs NZ Semi Final: विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारत विजयाच्या रथावर स्वार होण्यास तयार आहे. भारताने आपले सर्व ९ लीग सामने जिंकले आणि टेबल टॉपर म्हणून स्थान मिळविले. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ पाच सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

भारत पहिल्यांदा जगज्जेता (१९८३ चा विश्वचषक) झाला तेव्हा आताच्या संघातील एकही खेळाडू जन्माला आला नव्हता. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत देखील सध्याच्या संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडू नव्हते. मात्र आमचे लक्ष विश्वचषक जिंकण्यावर आहे, इतिहासात काय घडले यावर नाही, असे रोहित शर्माने सांगितले. (world cup 2023 latest marathi news)

रोहितला पत्रकारांनी आतापर्यंतच्या सर्वात खास क्षणाबद्दल पत्रकारांनी विचारले, यावर त्याने हसत उत्तर दिले. सर्वात खाश क्षण म्हणजे सघांतील ४ फलंदाजांनी नेदरलँडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात गोलंदाजी केली. मला वाटते सर्व खेळाडूंनी देखील या क्षणाचा आनंद घेतला. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन आणि सूर्यकुमार यांनी गोलंदाजी केली होती. या सामन्यात रोहित आणि विराटने प्रत्येकी एक विकेट घेतली.

एक कर्णधार म्हणून जर तुम्ही ठरवले असेल की तुम्हाला कसे खेळायचे आहे तर तुमच्यात स्पष्टता असायला हवी. तुम्हाला खेळाडूंना प्रचंड पाठिंबा द्यावा लागतो. आम्ही ज्या खेळाडूंवर भूमिका सोपवली आहे. त्या खेळाडूंच्या पाठिशी मी उभा आहे, रोहित शर्मा म्हणाला.  

माझा संपूर्ण फोकस खेळावर आहे. मी माझ्या करीअवर अजिबात विचार करत नाही. कदाचित मी १९ तारखेनंतर (विश्वचषक फायनल) नंतर माझ्या कारकिर्दीबद्दल विचार करेन पण सध्या लक्ष फक्त खेळावर आहे असल्याचे रोहित म्हणाला. जेव्हा जेव्हा आम्ही न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरलो तेव्हा तो संघ प्रचंड शिस्तबद्ध असल्याचे दिसले आहे. ते हुशारीने क्रिकेट खेळतात. ते विरोधी संघाची मानसिकता समजून घेतात आणि आम्ही देखील मानसिकता समजून घेतो.

रोहित शर्मा घरच्या मैदानावर सेमीफायनल खेळत आहे. रोहित म्हणाला, या मैदानावर मी खूप क्रिकेट खेळलो आहे. वानखेडेवर टॉस फक्टर महत्वाचा ठरत नाही.

पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत जेव्हाही तुम्ही विश्वचषकाचा खेळत असता तेव्हा तुमच्यावर दडपण असते. पण ज्या पद्धतीने आम्ही दबाव हाताळला ते कौतुकास्पद आहे. आम्हाला सातत्य टिकवून ठेवायचे आहे. आम्हाला फक्त आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे रोहित म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT