India Vs New Zealand Semi Final World Cup Live Score : वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताच्या 398 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावात गारद झाला. भारताकडून मोहम्मद शामीने दमदार गोलंदाजी करत 7 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत विराट कोहलीने 113 तर श्रेयस अय्यरने 106 धावांची खेळी करत दमदार साथ दिली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने 134 धावांची झुंजार खेळी केली.
आजच्या सामन्यात सपाटून मार खाणाऱ्या मोहम्मद सिराजने अखेर विकेट घेतली. त्याने सँटनरला बाद करत भारताला विजयाच्या आणखी जवळ नेले.
लॅथम बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिचेल यांनी पाचव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचत संघाला 300 च्या जवळ पोहचवले होते. मात्र बुमराहने 33 चेंडूत 41 धावा करणाऱ्या फिलिप्सची विकेट घेतली.
मोहम्मद शामीने केन विलियमसनचा सोपा झेल सोडला. त्याच विलियमसनने 69 धावांची खेळी करत मिचेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी रचली. मात्र शामीनेच विलयमसनला बाद करत ही जोडी तोडली. अन् त्याच षटकात टॉम लॅथमला बाद करत किवींना चौथा धक्का दिला. विशेष म्हणजे त्यानेच या सर्व चार विकेट्स घेतल्या आहेत.
डॅरेल मिचेलने 85 चेंडूत शतक ठोकले. त्याने विलियमसनसोबत 181 धावांची भागीदारी रचली. मात्र ज्या मोहम्मद शामीने त्याचा झेल सोडला होता त्याच शामीने त्याला 69 धावांवर बाद केले.
केन विलियमसनने झुंजार अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला 25 षटकात 164 धावांपर्यंत पोहचवले. त्याला डॅरेल मिचेलने देखील आक्रमक खेळी केली.
मोहम्मद शामीने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडल्यानंतर विलियमसन आणि डॅरेल मिचेलने डाव सावरत न्यूझीलंडचे 17 व्या षटकात शतक धावफलकावर लावले.
भारताच्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडने 5 षटकात 30 धावा केल्या होत्या. मात्र मोहम्मद शामीने कॉनवेला 13 धावांवर बाद केले.
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुलने 20 चेंडूत नाबाद 39 धावा करत भारताला 398 धावांपर्यंत पोहचवले.
विराट कोहली पाठोपाठ श्रेयस अय्यरने देखील वानखेडेवर शतक ठोकले. त्याचे हे वर्ल्डकपमधील सलग दुसरे शतक ठोकले. हे शतक त्याने 67 चेंडूत पूर्ण केले. याचबरोबर भारताने 48 षटकात 366 धावा केल्या होत्या.
विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने आपला दांडपट्टा सुरू केला. त्याने फटकेबाजी करत भारताला 45 व्या षटकातच 350 धावांचा टप्पा पार करून दिला.
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 50 वे शतक पूर्ण करत सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला. त्यानंतर 113 चेंडूत केलेली 117 धावांची ही खेळी टीम साऊदीने संपवली. विराट कोहली बाद झाला त्यावेळी 327 धावा झाल्या होत्या.
विराट कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी करत भारताला 31 षटकातच 221 धावांच्या पार पोहचवले. त्याने श्रेयस अय्यर सोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.
शुभमन गिलने 65 चेंडूत 79 धावा करत भारतीय संघाला 20 व्या षटकात 150 शतकी मजल मारून दिली होती. मात्र त्यानंतर त्याच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. गिल शतकाच्या जवळ पोहचत होता तोपर्यंतच त्याला दुखापत झाल्याने चाहते हळहळले.
रोहित शर्मा बाद झाल्यावर शुभमन गिलने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला शतकी मजल मारून दिली.
वानखेडेमध्ये शुकशुकाट पसरली आहे, कारण भारताची पहिली विकेट 71 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करत असताना तो झेलबाद झाला.
भारताने पाच षटकात एकही विकेट न गमावता 47 धावा केल्या आहेत. रोहित आणि गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. दोघेही वेगाने धावा काढत आहेत. पाच षटकांनंतर रोहित 34 तर गिल 11 धावांवर खेळत आहे.
भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने पहिले षटक टाकले. आणि रोहितने त्याला 10 धावा मारल्या.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननेही आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आहे, जिथे पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे लिंक वर क्लिक करा - IND vs NZ : सेमीफायनल आधी बदललं वानखेडेवरचं पिच? BCCI वर लागले मोठे आरोप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.