India vs New Zealand 2nd T20I Live Streaming 
क्रीडा

IND vs NZ: करो या मरो! दोन दिग्गज फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय; पृथ्वी उघडणार का टीम इंडियाचे दरवाजे

भारतासाठी आता प्रतिष्ठेची लढाई; न्यूझीलंडविरुद्ध लखनौमध्ये दुसरा ट्वेंटी-२० सामना रंगणार

Kiran Mahanavar

India vs New Zealand 2nd T20I Live Streaming: डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरच्या प्रभावी कामगिरीमुळे पहिल्या लढतीत पराभवाला सामोरा गेलेला भारतीय क्रिकेट संघ आता उद्या लखनौ येथे होत असलेल्या दुसऱ्या लढतीत टी-२० मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. याचप्रसंगी पाहुणा न्यूझीलंड संघ भारतामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

सलामी फलंदाज शुभमन गिल याने एकदिवसीय मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र त्याने आतापर्यंत फक्त चारच टी-२० सामने खेळले आहेत. टी-२० प्रकारात त्याला अद्याप मोलाचा ठसा उमटवता आलेला नाही, पण तरीही त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत. ईशान किशन व दीपक हुडा या दोन्ही फलंदाजांचा फॉर्म मात्र भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या लढतीत खणखणीत द्विशतक झळकावल्यानंतर ईशानकडून सात डावांमध्ये (एकदिवसीय व टी-२० मिळून) सपशेल निराशा झाली आहे. टी-२० प्रकारात त्याने अखेरचे अर्धशतक २०२२ मधील जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले आहे. दीपकलाही मागील १३ डावांमध्ये अपेक्षेला अनुसरून कामगिरी करता आलेली नाही. या दरम्यान त्याला १७.८८ च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० लढतीत फिरकी गोलंदाजांसमोर त्याची दैना उडाली होती. याच पार्श्वभूमीवर आगामी काळ हा ईशान व दीपक या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

सुंदर, सूर्या फॉर्ममध्ये

भारतासाठी आजची लढत करो या मरो अशीच असणार आहे. या लढतीत पराभूत झाल्यास भारताला टी-२० मालिकेवर पाणी सोडावे लागणार आहे. मात्र या वेळी भारतासाठी एक जमेची बाजू आहे. ती म्हणजे टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला सूर्यकमार यादव हा फॉर्ममध्ये आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या लढतीत गोलंदाजीसह फलंदाजीतही चमक दाखवली आहे. या दोघांच्या जबरदस्त फॉर्मचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड यांच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडे होताहेत का, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

उमरान, अर्शदीपने खेळ उंचवावा

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० लढतीत भारतीय संघातील गोलंदाजांना न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. उमरान मलिक व अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारताने ही लढत २१ धावांनी गमावली. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची षटके यावेळी निर्णायक ठरली. या दोघांनाही आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव यांच्यासोबत युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजाला अंतिम संघात स्थान देण्यात येते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT