IND vs NZ Semi-Final sakal
क्रीडा

IND vs NZ Semi-Final : उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये होणार बदल? कोणत्या खेळाडूला मिळणार संधी

Kiran Mahanavar

India vs New Zealand Semi-Final Playing 11 : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज (15 नोव्हेंबर) मोठा सामना खेळला जाणार आहे. आज या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना आहे. यजमान भारतासमोर त्याच न्यूझीलंडचे आव्हान आहे, ज्याने गेल्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत त्यांचा पराभव केला होता.

आयसीसी टूर्नामेंटमध्ये नेहमीच भारतावर वर्चस्व गाजवणाऱ्या या किवी संघाकडून बदला घेण्याची यापेक्षा चांगली संधी टीम इंडियाकडे असू शकत नाही. घरच्या मैदानावर आणि हजारो प्रेक्षकांच्या जोरावर टीम इंडिया न्यूझीलंडला हरवू शकते.

आणखी एक विशेष बाब म्हणजे भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नाही आणि लीग टप्प्यात किवी संघाचाही पराभव केला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकून अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचा किवीजवर वरचष्मा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

शेवटच्या 5 सामन्यांमध्ये प्लेइंग-11 मध्ये नाही कोणताही बदल

भारतीय संघाचा साखळी टप्प्यातील पाचव्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना झाला तेव्हापासून, आजपर्यंत म्हणजे शेवटच्या 5 सामन्यांमध्ये, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

भारतीय संघाने गेल्या दोन टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघात वारंवार केलेल्या बदलांचे परिणाम पाहिले आहेत. अशा स्थितीत यावेळी टीम इंडियाने आपला अतिप्रयोगाचा फॉर्म्युला पूर्णपणे सोडून दिला आहे. त्यामुळे आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही भारतीय संघात कोणत्याही बदल होणार नाही.

गेल्या 5 सामन्यांपासून प्लेईंग-11 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. सर्व खेळाडूही तंदुरुस्त आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही बदलाची गरज भासत नाही.

पुन्हा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना फिरकीपेक्षा जास्त मदत करते. अशा स्थितीत क्षेत्रानुसारही भारताला अतिरिक्त फिरकीपटू खेळवण्याची गरज भासणार नाही. एकूणच भारताची प्लेइंग-11 परिपूर्ण तयार दिसते.

टीम इंडियाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT