Ind vs Nz World Cup 2023 Virat Kohli and Rohit Sharma : एकदिवसीय वर्ल्ड कपचा 21 वा सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेल्या या सामन्यात टीम इंडियाने चार विकेटने न्यूझीलंडचा पराभव केला.
या विजयासह भारतीय संघ 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर गेला आहे. विराट कोहली आणि मोहम्मद शमी या सामन्याचे हिरो ठरले. गोलंदाजी करताना शमीने 5 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर कोहलीने 95 धावांची मॅच विनिंग खेळी खेळली. आता एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कोहली आणि रोहित समोरासमोर आहेत.
या विजयात मोहम्मद शमी आणि कोहलीने सर्वात महत्त्वाचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ शमीच्या घातक गोलंदाजीसमोर 273 धावांत सर्वबाद झाला. यानंतर फलंदाजी करताना भारताने 48 षटकांत 6 गडी गमावून सामना जिंकला. विराट कोहलीने संघाकडून सर्वाधिक 95 धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 2 षटकार आले. या धावांसह कोहली वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या नावावर 354 धावा आहेत.
कोहली आणि रोहितमध्ये झाली बाचाबाची?
आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पहिल्या डावातील आहे. कोहली रोहितला काहीतरी बोलत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे रोहित थोडासा शांत झाला. यानंतर तोही काही बोलला. दोघांमध्ये बराच वेळ बोलण झाल. मात्र, व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होते की, कोहली त्याला मैदानातील काही बदलांबद्दल सांगत होता, त्यानंतर रोहित खाली तोंड करून निघून गेला. व्हिडिओ पहा....
न्यूझीलंडवरच्या या विजयामुळे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये संघ अपराजित राहिला असून 10 गुण मिळवले आहेत. आता संघाला टॉप-4 मध्ये जाण्यासाठी आणखी 2 विजयांची गरज आहे. 14 गुणांसह कोणताही संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो. भारताची कामगिरी पाहता टॉप-4 मध्ये स्थान मिळवणारा तो पहिलाच संघ असेल असे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.