IND vs PAK Gautam Gambhir on Virat Kohli sakal
क्रीडा

IND vs PAK: 'हा कोणता शॉट...', पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली आऊट झाल्यानंतर गौतम गंभीर संतापला

Kiran Mahanavar

IND vs PAK Gautam Gambhir on Virat Kohli : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामन्यात पावसाने खेळ खंडोबा केला आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, पाकिस्तानी वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला त्यामुळे खूपच निराश दिसत होता. त्याने कोहलीच्या शॉट निवडीवर टीका केली.

कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने कव्हर ड्राइव्हने सुरुवात केली. तो पाकिस्तानविरुद्ध आणखी एक शानदार खेळी खेळेल असे वाटत होते. पण त्याला लवकरच शाहीन शाह आफ्रिदीने बाद केला. विराट सात चेंडूत केवळ चार धावा करून बाद झाला.

त्याने खेळलेला शॉटवर गंभीरने टीका केली. स्टार स्पोर्ट्सवर गंभीर म्हणाला की, हा कोणता शॉट होता, ना फॉरवर्ड ना बॅकवर्ड. शाहीन आफ्रिदीसारख्या खेळाडूला खेळवल्यावर तेच मिळते. पुढे जायचे की मागे जायचे हेच कळत नाही. मात्र, कॉमेंट्रीमध्ये विराटवर झालेल्या चर्चेदरम्यान वकार युनूस म्हणाला, 'तो थोडा दुर्दैवी होता. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडननेही वकार युनूसच्या विधानाशी सहमती दर्शवली.

सामन्यात पाकिस्तानी वेगवान गोलंदाजीसमोर भारताचे आघाडीचे फलंदाज आपली जादू दाखवू शकले नाहीत, पण इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची विक्रमी भागीदारी केली. इशान किशनने 81 धावा केल्या तर हार्दिक पांड्या 87 धावा करून बाद झाला.

अशाप्रकारे भारतीय संघ निर्धारित 50 षटकांपूर्वीच 48.5 षटकांत 266 धावांवरच मर्यादित राहिला. मात्र, पावसामुळे पाकिस्तानच्या डावाला सुरुवात करता आली नाही आणि सामना रद्द झाला.

यासह पाकिस्तानी संघाने तीन गुणांसह सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाचा ग्रुप स्टेजमधील दुसरा सामना आता सोमवारी नेपाळशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT