India vs Pakistan Score Asia Cup 2023 Super 4 : भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2023 सुपर 4 सामना आज कोलंबोमध्ये रंगला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारत आक्रमक सुरुवात केली. मात्र, भारतीय डावाच्या 25व्या षटकात पावसामुळे सामना थांबवण्यात आला. सुमारे ५ तास प्रतीक्षा केल्यानंतरही ओल्या मैदानामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. सामना थांबला तोपर्यंत टीम इंडियाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या.
केएल राहुल 28 चेंडूत 17 धावा आणि विराट कोहली 16 चेंडूत 8 धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 38 चेंडूत 24 धावांची भागीदारी झाली आहे. उद्याचा राखीव दिवशी भारतीय संघ 24.1 षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल.
यापूर्वी प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल याचा तांडव पाहायला मिळाला. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली.
शादाबने कर्णधार रोहितला बाद केले. हिटमॅनने आपले 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. त्याचवेळी शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुभमन 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला.
कोलंबोमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. अंपायर काय निर्णय घेतलेले पाहावे लागेल. मैदान झाकले आहे, त्यामुळे सामना राखीव दिवशी जाऊ शकतो.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमशी चर्चा केलीनंतर रात्री 8:30 वाजता पंच पुन्हा खेळपट्टीची पाहणी करतील. पंचांनी सांगितले की सामना रात्री नऊ वाजता सुरू होईल. 9 वाजता सुरू झाला तर 34-34 षटकांचा सामना होईल. म्हणजेच टीम इंडिया आणखी 10 षटके खेळणार आहे.
10:30 ते 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 90 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया फलंदाजी करू शकणार नाही आणि डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.
सायंकाळी 7.30 वाजता पंच मैदानाची पाहणी करतील. मैदान ओले आहे आणि अशा परिस्थितीत पंचांना कोणताही धोका पत्करायचा नाही. आज 20 षटकांचा सामना आयोजित करण्याची कट ऑफ वेळ रात्री 12 वाजता आहे.
10:30 ते 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 90 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया फलंदाजी करू शकणार नाही आणि डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.
पाऊस थांबला आहे. कव्हर काढले जात आहेत. पावसामुळे आऊटफिल्ड ओले आहे, ते कोरडे करण्याचे प्रयत्न ग्राउंड्समन करत आहेत. षटके कापण्याची कट ऑफ टाईम संध्याकाळी 6.22 होता, म्हणजेच आता षटके कापण्यास सुरुवात होईल.
अशा परिस्थितीत डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल. आजच सामन्याचा निकाल लावण्याचा सामना अधिकारी प्रयत्न करतील. सामना होऊ शकला नाही तरच सामना उद्या राखीव दिवशी जाईल.
आज 20 षटकांच्या सामन्याची कट ऑफ वेळ रात्री 12 आहे. यानंतर आजचा सामना होणार नाही. सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी किमान 20 षटकांचा सामना होणे आवश्यक आहे.
पाकिस्तानला मिळू शकते मोठे लक्ष्य
20 षटकात 181 धावा
21 षटकांत 187 धावा
22 षटकात 194 धावा
23 षटकात 200 धावा
24 षटकात 206 धावा
सामना अधिकारी आजचा सामना संपवण्याचा प्रयत्न करतील. आज सामना होऊ शकला नाही, तर उद्यापासून राखीव दिवशी सामना सुरू होईल. आज जर डकवर्थ लुईस नियम आला आणि भारतीय संघ पुन्हा फलंदाजी केली नाही, तर पाकिस्तानला लक्ष्य दिले जाईल.
जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा -
कोलंबोमध्ये पाऊस थांबला आहे. कव्हर काढण्याचे काम सुरू आहेत. सामना किती वाजता सुरू होणार हे अजून तरी कळालं नाही. कारण पाऊस इतका जोरात होता की मैदान ओली झाले आहे. ग्राउंड्समन मैदानावर काम करत आहे. बराच वेळ लागू शकतो.
मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला आहे. सामना थांबला तोपर्यंत टीम इंडियाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या.
सध्या केएल राहुल 28 चेंडूत 17 धावा आणि विराट कोहली 16 चेंडूत 8 धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 38 चेंडूत 24 धावांची भागीदारी झाली आहे. या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरही सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ 24.1 षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल.
यापूर्वी प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल याचा तांडव पाहायला मिळाला. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली.
शादाबने कर्णधार रोहितला बाद केले. हिटमॅनने आपले 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. त्याचवेळी शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुभमन 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला.
16 चौकार आणि 4 षटकारची भागीदारी तुटली आहे. 121 धावांवर भारतीय संघाची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा 49 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला बाद केले. रोहितने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.
रोहित शर्मानंतर शुभमन गिलही बाद झाला आहे. शाहीन आफ्रिदीने गिलला झेलबाद केले. गिलने 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या 124/2 आहे.
कर्णधार रोहित शर्माने संथ सुरुवातीनंतर गियर बदलले आणि 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 15 षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता 115 धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्माने वनडे कारकिर्दीतील 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने शादाब खानच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.
सध्या रोहित 46 चेंडूत 55 धावा आणि शुभमन गिल 44 चेंडूत 53 धावा करत फलंदाजी करत आहे.
भारताने कोणतेही विकेट न गमवता 100 धावा केल्या आहेत. संघाची धावसंख्या 13.2 षटकात 100 च्या पुढे गेली आहे. रोहित आणि गिलने टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली आहे.
शुभमन गिलने 37 चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध 67 धावांची नाबाद खेळी खेळली होती. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता 96 धावा आहे.
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांमध्ये वर्चस्व गाजवले. रोहित आणि गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. 10 षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न पडता 61 धावा आहे. गिल 41 तर रोहित 18 धावांवर खेळत आहे.
पाच षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता 37 धावा केल्या आहेत. शाहीनच्या पहिल्याच षटकात रोहितने षटकार ठोकला होता. यानंतर शाहीन पुन्हा तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला. या षटकात शुभमनने त्याच्या चेंडूंवर तीन चौकार मारले. आत्तापर्यंत भारतीय सलामी जोडीने सहाचा चौकार आणि एक षटकार मारत 37 धावा केले आहे.
भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. रोहित शर्मासमोर शाहीन आफ्रिदीचे आव्हान आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार मारला.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, मी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार होतो. रोहितने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे.
कोलंबोमध्ये सध्या सूर्यप्रकाश आहे. पाकिस्तान क्रिकेटने स्टेडियमचा फोटो शेअर केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.