Team India playing-11 
क्रीडा

IND vs PAK: टीम इंडियाची प्लेइंग-11 ठरली, 2 बदल होणार, हे खेळाडू जाणार बाहेर?

Kiran Mahanavar

IND vs PAK Asia Cup 2023 : चाहते 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या दिवशी पुन्हा एकदा पावसाची भूमिका महत्वाची असू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 90 टक्के पाऊस येणार आहे. त्यामुळे चाहते निराश होऊ शकतात. पण खराब हवामानामुळे आशियाई क्रिकेट परिषदेला 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवावा लागला.

पाऊस असला तरी या सामन्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल करू शकतो. हे दोन्ही बदल संघाच्या विजयाचा पाया रचतील. यासोबत टीम इंडियाचे फलंदाज यावेळी पहिल्या सामन्यातील उणीवा दूर करतात का, हे पाहणे बाकी आहे. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी या दोन खेळाडूंना वगळल्या जाऊ शकते.

श्रेयस अय्यरचे संघातून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. कारण पहिल्या सामन्यात अय्यरला विशेष काही करता आले नाही. तसेच अनेक महिन्यांनंतर केएल राहुल संघात पुनरागमन करु शकतो. केएल राहुलला वर्ल्ड कप 2023च्या संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे बीसीसीआयसह निवडकर्त्यांना केएल राहुलला जास्तीत जास्त संधी द्यायची आहे.

काही दिवसांपूर्वी बुमराह वडील झाला आहे, त्यामुळे तो भारतात गेला होता. तर नेपाळसोबतच्या सामन्यात बुमराहऐवजी शमीची संघात निवड करण्यात आली होती. पण आता बुमराह पुन्हा संघात सामील झाला आहे. त्यामुळे संघाच्या प्लेइंग 11 मध्ये त्याचे पुनरागमन निश्चित आहे आणि शमी बाहेर जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT