India vs Pakistan Women's T20 World Cup Live Streaming : आयसीसीच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या वहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताचा टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तानशी मुकाबला होत आहे. एरवी या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावर नेहमीच वर्चस्व राखणाऱ्या भारताने या अगोदरच्या आशिया कप स्पर्धेतील पाकविरुद्धची लढत गमावली होती.
त्या आशिया कप स्पर्धेत भारताने फलंदाजीच्या क्रमवारीत अतिप्रयोग केल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. आज मात्र क्षणोक्षणी सावधता बागळून पाकला संधी न देण्यावर भारतीयांचा भर असेल. दुखापतीमुळे हुकमी फलंदाज स्मृती मानधना खेळू शकणार नसली तरी भारताची ताकद कमी होणार नाही. काही दिवसांपूर्वी १९ वर्षांखालील महिलांचे टी-२० विश्वकरंडक विजेतेपद मिळवल्यामुळे या सिनियर महिला संघाचे मनोबल वाढलेले असणार. त्यात विजेतेपद मिळवून देणाऱ्या शेफाली वर्मावर अधिक जबाबदारी असेल.
असे असले तर स्मृती मानधनासह कर्णधार हरमनप्रीत कौरही दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आज सामन्यापूर्वीच अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. हरमनप्रीत खेळू शकली नाही तर नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता असेल. शेफाली वर्माला पसंती दिली जाऊ शकते.
विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी अगोदरच दक्षिण आफ्रिकेत दाखल होऊन भारतीय संघ येथे तिरंगी मालिका खेळला होता. अंतिम सामना जिंकून विजेतेपदाची संधी मात्र गमावली होती. त्यानंतर सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवचा सामना करावा लागला होता मात्र बांगलादेशला हरवले होते.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धामध्ये भारतीय महिला संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत धडक मारत आहे, परंतु इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाचे अडथळे पार करता आलेले नाही. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर खेळू शकली नाही तर मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज जेमिमी रॉड्रिग्जवर अधिक जबाबदारी असेल, परंतु गेल्या काही सामन्यात त्याला आपल्या गुणवत्तेला न्याय देता आलेला नाही.
संघ यातून निवडणार
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हलींन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणूका ठाकूर, अंजली सर्वानी, पूजा वस्त्रकार राजेश्वरी गायकवाड आणि शिखा पांडे.
पाकिस्तान : बिसमा मारूफ (कर्णधार). ऐमान अन्वर, अलिया रियाझ, अएशा नसीम, सदाफ शम्स, फातिमा साना, जवेरिया वद, मुनोवा अली, ना संघ, निदा दर, ओमाईमा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमिन, सिद्रा नवाझ आणि ता हसन,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.