Ind vs Pak World Cup 2023 Indian Bowlers Big Record 
क्रीडा

Ind vs Pak : योगायोग आला जुळून! 2011 च्या कामगिरीची रोहित सेनेकडून पुनरावृत्ती आता...

Kiran Mahanavar

Ind vs Pak World Cup 2023 Indian Bowlers Big Record : वर्ल्डकप 2023 च्या हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 42.5 षटकात 191 धावांवर आऊट करून बॅकफूटवर ढकलले. प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावत 192 धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. त्याचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा त्याच्याविरुद्ध पराभव झालेला नाही.

या हायव्होल्टेज सामन्यात शार्दुल ठाकूर वगळता सर्व भारतीय गोलंदाजांनी विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय 5 गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्याची ही तिसरी वेळ आहे. यादरम्यान 2011 च्या वर्ल्डकप मधला योगायोग जुळून आला. रोहित सेनेकडून 5 गोलंदाजांनी 2-2 विकेट घेण्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया चॅम्पियन बनली होती. यावेळी पहिल्यांदाच भारताच्या 5 गोलंदाजांनी वनडे सामन्यात 2-2 विकेट घेतल्या. ते पण पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात हा प्रकार घडला होता. झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग आणि युवराज यांनी 2-2 विकेट घेतल्या.

तर 2014 मध्ये भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी 2 बळी घेतल्या होत्या. आता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी 2023 वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानविरुद्ध 2-2 विकेट घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading Closing: मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार तुफान वाढीसह बंद, कोणते शेअर्स चमकले?

Arvind Sawant: FIR दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हात्रे, शेलारांची आठवण करुन देत म्हणाले, कायदेशीर...

...तर राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष बंद करावा, महायुतीतील बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, काय म्हणाले?

Suryakumar Yadav ला कर्णधार व्हायचं होतं, त्याने मुंबई इंडियन्सला विचारलही, पण...

Latest Marathi News Updates: बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं; मुख्यमंत्र्यांची अरविंद सावंतांवर टीका

SCROLL FOR NEXT